गळीत हंगाम 15 आक्टोबरपासुन का सुरु करायचा???
मार्केट मध्ये नविन सिझनची साखर लवकर यावी म्हणुन, हि सरकारला तात्पुरती रिलिफ मिळेल पण साखर दर नियंत्रित ठेवणेसाठी दुरगामी उपाय ठरणार नाही.
कारणआक्टोबर महिन्यात ऊसामध्ये फक्त पाणीच जास्त असते,शुक्रोज व फायबरचे प्रमाण फार कमी असते व उसाची वाढ पुर्ण झालेली नसते म्हणजे ऊसाचे वजन कमी असते.
तेंव्हा हंगाम आक्टोबरपासुन सुरु करुन फायदा कोणाला
ऊस ऊत्पादक शेतकरी? का कारखानादार ? का सरकार???
जर हंगाम 15आक्टोबरपासुन सुरु केला तर
1) कारखाने डिसेंबरमध्येच बंद होतील
2) रिकव्हरी कमी व ऊसाचे वजन कमी यामुळे पुढीलवर्षी मार्केटमध्ये साखरची ऊपलब्धा कमी होईल.
3) फायबर कमी असलेमुळे बाॅयलरला बगॅस कमी पडणेची शक्यता आहे व बगॅस स्टाॅक नसलेमुळे मिल स्टापेजसमध्ये बाॅयलर प्रेशर टिकविणेसाठी कसरत करावी लागेल.
4) ऊसात पाण्याचे प्रमाण जास्त असलेमुळे ETP Manager यांना water management साठी कसरत करावी लागणार.
5) आक्टोबरमध्ये ऊस खरेदी करणे म्हणजे FRP देउन पाणी खरेदी करणे होय.
6) FRP ही सरासरी रिकव्हरीवर ठरते म्हणजेच FRP कमी व ऊसाचे वजन कमी परिणामी ऊस ऊत्पादक शेतकरी यांना तोटाच.
7) कारखानदार यांना सुध्दा कमी क्रशिंग, कमी रिकव्हरी,कमी बगॅस,कमी मोलेसस ऊत्पादन यामुळे अर्थकारण बिघडुन एकरकमी FRP देणे अवघड होईल.
याउलट जर कारखाने 15 नोहेंबरनंतर सुरु केलेतर
एक महिन्यात ऊसाची वाढ होईल व हेक्टरी टनेज वाढेल व ऊसात पाणी कमी होऊन शुक्रोज व फायबरचे प्रमाण वाढेल म्हणजेच साखर , बगॅसच व मोलसेसचे ऊत्पादन वाढेल.
एकंदरीत टनेज वाढलेमुळे कारखाने डिसेंबर ऐवजी जानवारी/ फेब्रुवारी पर्यंत चालतील.
याचा परीणाम पुढील वर्षी मार्केटमध्ये साखरेची कमतरता जास्त भासणार नाही.
राॅशुगर आयात व रिप्रोसेस करुन मार्केटमध्ये आणणे कितपत फायदेशीर ठरेल हेही पाहणे आवश्यक आहे.
कारण राॅशुगरची आतरराष्ट्रीय मार्केटमधील किंमत + Shipping charges+ Conversion cost. हे सर्व धरुन मार्केटमध्ये विक्री किंमत किती मिळेल हे प्रश्न चिन्ह आहे.तेंव्हा राॅशुगर आयात करुन फायदा होईल का नाही हे आत्ताच सांगणे अवघढ आहे.
Duel Sugar Pricing :-
पुर्वी लेव्ही साखर रुपात हि पध्दत अस्तित्वात होती, परंतु कारखानदार यांनीच हि पध्दत बंद करणेस सरकारला भाग पाडले.
वाढलेल्या साखर दराचा आम जनतेला त्रास होऊ नये म्हणुन सरकारने पुर्वीप्रमाणे कारखानदार यांचेकडुन आवश्यक असलेली साखर कमी दरात घेऊन ती स्वस्त धान्यदुकानातुन वितरीत करावी. (काळाबाजार रोखणेसाठी सध्या असलेल्या नियमाचे AI तंत्रज्ञान वापरुन प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे)
FRP तीन हफ्तामध्ये देणे आवश्यक :—
बॅकेचे कर्ज काढुन एकरकमी FRP देणे म्हणजे बॅकांना व्याज देवुन मोठे करणे होय. यात कारखाना व शेतकरी दोघांचाही तोटा आहे. याउलट कर्ज काढुन व्याज भरणेपेक्षा पुर्वीप्रमाणे तीन हफ्तात FRP देणे हे शेतकरी व कारखानदार दोघांनाही फायदेशीर ठरेल, कारण ऊत्पादीत झालेली साखर ही शासनाने ठरवुन दिलेल्या रिलिज आर्डरनुसार विकणे बंधनकारक असते.
मी दोनवर्षापुर्वी जर गाळप 15 नोहेंबर ऐवजी 15 ऑक्टोबरपासुन सुरू केलेतर किती तोटा होतो हे उदाहणासहीत आपल्याच ग्रुपमध्ये लेख प्रसिध्द केला होता.
भारत तावरे
शुगर टेक्नोलाॅजिस्ट


