त्याग व दानाचे प्रतिक : ईद- ए- मिलाद
(रत्नाकर पाटील धाराशिव)
भारत विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.जगाला विविधतेत एकतेचे दर्शन करून देणारा देश भारत. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई, बौद्ध, पारशी असे विविध धार्मिक लोक भारत या कौटुंबिक घरात सुख समाधानकारक रहातात. बंधूंभाव देशाचा प्राण आहे. एकमेकांशी सहकार्य भावना व सण समारंभ साजरे केले जातात. दीपावली असो की ईद ए मिलाद असो सर्व मिळून मिसळून सण साजरे केले जातात. मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण महत्त्वाचा मानला जातो. ईद- ए- मिलाद म्हणजे अल्लाहचे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म दिवस. ईद उल फितर हा शब्द अरबी भाषेतील आहे. ईद शब्दाचा अर्थ आनंद व फितर शब्दाचा अर्थ दान. गरीब लोकांना अन्नाच्या रूपाने दान केले जाते. आपसातील बंधुभावाचे संबंध प्रस्थापित व्हावे हा उद्देश. ईद म्हणजे प्रेम व आनंद साजरा करण्याचा दिवस. ईद त्यागाचे पर्व मानले जाते.
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म इ. स. ५७१ मध्ये सौदी अरेबियातील मक्का या गावात झाला. जन्मा अगोदरच महंमद पैगंबराचे वडील मृत्यू पावले. वयाच्या ६ व्या वर्षी आईला देवाज्ञा झाली. लहानपणी माता- पित्याचे छत्र हरपले. चुलत्यांने हजरत मुहमंद पैगंबरांचे संगोपन केले. लहानपणीच शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यानंतर इस्लाम धर्मातील लोकांचे दु:ख त्यांनी जवळून पाहिले. इस्लाम धर्माची स्थापना केली. तो स्वतः संस्थापक झाले. जगाला उदारता, समता, विश्वबंधूत्व, सामाजिक न्याय, एकतेची शिकवण दिली. ही शिकवण विशिष्ट जातिपूरती किंवा धर्मापूरती मर्यादित नव्हती. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी पैगंबरांनी शिकवण दिली. समस्त मानव जातीच्या हितासाठी पैगंबरांनी अनमोल शिकवण दिली.
सर्व मुस्लिम बंधू- भगिनींस ईद- ए- मिलाद सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
रत्नाकर बाबुराव पाटील {पर्यवेक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता. जि.धाराशिव
मो.९४०३३९४८१८.


