*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की पारनेर तालुक्यातील गुणोरे गावचे रहिवासी असलेले अतिशय हुशार व्यक्तिमत्व बँक क्षेत्रातील प्रशासकीय क्षेत्रात 49 वर्ष अनुभव असलेले भास्कर लक्ष्मण खोसे साहेब यांची नुकतीच सारस्वत बँकेच्या संचालक पदी निवड झाली त्याबद्दल तालुक्यात जिल्ह्यात तसेच मुंबईमध्ये त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सारस्वत बँकेत नोकरी लागलेल्या खोसे यांनी विविध पदावर काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविला त्यामुळेच निष्ठेचे फळ म्हणून त्यांची सारस्वत बँकेने संचालक पदावर निवड झालेली आहे सहकारी क्षेत्रातील त्यांचा अनुभव अतिशय महत्त्वपूर्ण असून पारनेर तालुक्यातील मुंबई येथील रहिवासी कडून त्यांच्या अभिनंदन करण्यात आले आहे पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन


