पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोज येथील माता मळगंगेची श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी जाळी निघोज येथे मळगंगेची पालखी जाऊन त्या ठिकाणी विधीवर कार्यक्रम होतात तेथे कवाद व परिसरातील भक्तगणाकडून महाप्रसाद आयोजन केले जाते देवीच्या आख्यायिकेनुसार देवी कोणत्यातरी कारणाने जाळी निघोज येते रुसून गेली होती व हे भक्तगणाला कळल्यानंतर एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन मी जाळी निघोजयेते आहे असे सांगितले त्यानुसार श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी ग्रामस्थ देवीचे भक्तगण यात्रा कमिटी माता मळगंगेच्या मंदिरातून देवीची पालखी जाळी निघोज येथे नेतात व विधी व पूजा करून तेथील कार्यक्रम संपन्न करून पालखी परत निघोज येथे मंदिरात येते हा सोहळा पाहण्यासाठी व देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने निघोज येते येत असतात ही माहिती श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट अध्यक्ष सचिव व विश्वस्त यांनी दिली प्रसिद्धी प्रमुख डॉ मुकुंद निघोजकर यांच्यामार्फत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले आहे श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट चे कार्याध्यक्ष माननीय श्री वसंतराव बाबासाहेब कवाद साहेब व त्यांचे सर्व विश्वस्त तसेच सल्लागार मंडळ व कर्मचारी वृंद सातत्याने माता मळगंगेच्या विकासासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या कामाबद्दल लोक समाधानी आहेत त्यांनी नुकतेच श्रीक्षेत्र कुंड येथे विसावा कार्यालय लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले आहेत अतिशय अल्पशा दरात लोकांची सोय झाल्यामुळे जनसमानसक त्यांच्याबद्दल आदर आहे तसेच त्यांनी माता मळगंगेच्या गावातील मंदिराच्या जवळच भाविक भक्तांसाठी सकाळी व सायंकाळी अल्पशा दरात भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या या प्रयत्नामुळे व माता मळगंगेच्या आशीर्वादामुळे देणगीचा ओघ चालू आहे भाविक भक्त सुविधांचा लाभ घेताना दिसत आहे माता मळगंगेच्या श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी होणाऱ्या पालखी सोहळ्याला लोक आवर्जून भेट देतात व दर्शन घेऊन पाहून होतात आपणही दर्शनाचा लाभ घ्या अशी आवाहन श्री मळगंगा ग्रामीण विकासाचे सचिव श्री शांताराम कळसकरसाहेब यांनी केले आहे




