*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की नुकतेच श्री शेत्र कुंड पर्यटन स्थळ निघोजेटी माता मळगंगेच्या मंदिरात चोरी झाली साधारणता दहा पंधरा दिवस झाली तरीअध्याप तपास न लागल्यामुळे निघोज ग्रामस्थांकडूनसंताप व्यक्त करण्यात येत आहे यामध्ये निघोज गावच्या सरपंच सौ चित्राताई सचिन वराळ पाटील व त्यांचे सहकारी तसेच श्रीमलगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट सर्व विश्वस्त सल्लागार मंडळ तसेच निघोज व्यापारी असोसिएशन तसेच पारनेर तालुका पत्रकार संघ यांच्यामार्फत पोलीस निरीक्षक श्री दिवटे साहेब यांना निवेदने सादर झालेली आहेत परंतु अद्याप तपास न लागल्यामुळे ग्रामस्थांचा 31 3 नंतर रस्ता रोको व गाव बंद ठेवण्याचा विचार आहे त्या दृष्टिकोनातून त्वरित कार्यवाही होऊन आरोपीस अटक व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे याबाबत लवकरच यंत्रणे कडून आरोपीस अटक होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ही माहिती श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे प्रसिद्धीप्रमुख जेष्ठ पत्रकार डॉ मुकुंद निघोजकर यांनी दिली आहे




