पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील भ्याड हल्याचा पारनेर तालुका पत्रकार संघाकडून निषेध.
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
पत्रकार सुशील थोरात यांच्यावर नगर शहरात काही तथाकथित गुंडांनी हल्ला करुन हुकुमशाही दाखवली असून या गुंडांना पोलीसांनी तत्काळ अटक करुन कारवाई करावी तसेच सुशील थोरात यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करीत पारनेर तालुका पत्रकार संघाने थोरात यांच्या वरील भ्याड हल्याचा निषेध केला आहे. याबाबतचे निवेदन सोमवार दि.२४ रोजी पारनेरचे पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंदराव निघोजकर,पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर, माजी अध्यक्ष मार्तंड बुचुडे, माजी तालुकाध्यक्ष शरद झावरे, पदाधिकारी सनी सोनावळे, विनोद गोळे, शशी भालेकर, संतोष सोबले, भास्करराव कवाद, सतिष रासकर, शिरीष शेलार, विकास शेंडकर, संतोष ईधाटे, सुरेंद्र शिंदे, योगेश खाडे, जयदीप कारखिले, जयसिंग हरेल, दत्तात्रय लंके, शरद रसाळ, दिपक करंजुले,
किरण शिंदे, रोहन उनवणे , विनोद साळवे, अविनाश भांबरे, सागर आतकर, आनंद भुकन,
आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की गुंड गर्दी यांच्यावर बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल नगर येथील दोन नंबरचे धंदे करणाऱ्या गुंडांनी थोरात व त्यांच्या चिरंजीवाला लक्ष केले होते. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. सहा दिवस होऊनही एकही आरोपी पकडला जात नाही याचा अर्थ या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीसांचा पाठींबा आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र सरकार पत्रकारांची योग्य ती दखल घेत नाहीत. पत्रकार संरक्षण कायद तसेच पत्रकारांना शासकीय योजनांचा फायदा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. याउलट हा लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा मोडकळीस निघेल यासाठी सरकारचा विन्हसंतोषी लोकांना छुपा पाठिंबा आहे की काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. सुशील थोरात एक शांत संयमी व निस्वार्थी पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक आहे असे असताना नगर येथील गुंडांनी त्यांना लक्ष करणे हा लोकशीहीवर मोठा आघात आहे. याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करीत असून या गुंडांना तक्ताळ अटक करुन कारवाई करावी अशी मागणी पारनेर तालुका पत्रकार संघाने केली आहे. पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यावेळी म्हणाले हा प्रकार निषेधार्थ असून पारनेर तालुका पत्रकार संघाने दिलेले निवेदन तातडीने वरिष्ठ अधिकारी यांना पाठवून या गुंडावर कारवाई करुण पत्रकार सुशील थोरात यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याची ग्वाही दिली.
चौकट – पत्रकार सुशील थोरात यांच्यावर भ्याड हल्ला करुण गुंडांनी लोकशाहीवर प्रहार केला आहे. याचा पारनेर तालुका पत्रकार संघाने निषेध करुण पारनेरचे पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना निवेदन दिले आहे. याबाबत कारवाई न झाल्यास पारनेर तालुक्यातील पत्रकार पोलिस अधीक्षक यांना भेटून काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत.
उदय शेरकर
( अध्यक्ष पारनेर तालुका पत्रकार संघ )
चौकट
सुशिल थोरात हे गेली अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सेवाभाव करीत आहेत. काही गुंडांनी त्यांच्यावर हा भयानक हल्ला केला आहे. याची तातडीने चौकशी होऊन संबधीत गुंडांना अटक झाली पाहिजे अन्यथा पत्रकार संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करील असा इशारा ज्येष्ठ मार्गदर्शक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंदराव निघोजकर यांनी दिला आहे.


