पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की यावर्षी सालाबाद प्रमाणे आळकुटी तालुका पारनेर येथे श्रावणी पोळ्याचा आनंद सर्व ग्रामस्थांनी व पाहुणे मंडळींनी घेतला गावातील कामधेनुबैल जोडी घोलप यांची गावातून सर्वांचे समवेत संवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकी अहिल्यानगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर भास्करराव शिरोळे त्यांच्या पत्नी डॉक्टर स्मिता शिरोळे तसेच दत्ता अर्जुन घोलप विलास अर्जुन घोलप व शेतकरी बांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. आळकुटी येथील पोळ्यासाठी गावातील ग्रामस्थ आपल्या पाहुण्यांना आमंत्रित करतात व मोठ्या प्रमाणात हा सणसाजरा करण्यात येतो त्याप्रमाणे याही वर्षी ग्रामस्थांनी पोळ्या सणाचा आनंद लुटला आहे


