*श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी जगताप दत्ताजी यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
श्रीगोंदा नगरपालिकेत सध्या आरोप प्रत्यारोप सुरु असलेले पहावयास मिळत आहेत. हे खरेच आहे की, फक्त दाखविण्यासाठी आहे, हे नागरिकांना कळेनासे झाले आहे.
राज्यामध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हातात हात घालून विकासाच्या दृष्टीने उत्तम पद्धतीने कामकाज पहात आहेत. विरोधकांना धूळ चारण्यात यशस्वी होत आहेत. अनेक कल्याणकारी योजना आणून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.
मात्र श्रीगोंदा नगरपालिकेत सध्या राजकीय वातावरण गढूळ झालेले दिसत आहे. सत्ताधारी भाजपा कडे अभ्यासू आणि संधीचे सोने करून विरोधकांना टोला मारण्याची संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. तर सत्तेत असणारी शिवसेना नगरसेवक कुठे तरी आपली बाजू मांडण्यात कमी पडताना दिसत आहेत.
काल नगरपालिकेत एकल महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेनेचे नगरसेवकांची अनुपस्थिती दिसून आली. या कडे लक्ष वेधून समाज बालकल्याण समितीच्या सभापती व नगरसेविका मीरा शिंदे यांनी अनेक वर्षे सामाजिक कामातून आणि आपल्या लेखणीतून असंख्य विषय मांडत सक्षमता दाखवून दिलेली आहे. मिरा शिंदे यांनी शिवसेनेचे नगरसेवक फक्त बोलतात मात्र जनहिताकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रसार मध्यमांच्या निदर्शनास आणून दिले. यावर शिवसेनेचे नगरसेवक काय भूमिका मांडतात हे पाहावे लागणार आहे.
श्रीगोंदा शहरातील रस्ते, पाणी, वीज तसेच घनकचऱ्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. मात्र भाजपा कडून यावर भाष्य करण्याचे टाळल्याचे दिसते आहे. वेळेवर आणि दररोज कचरा उचलला जात नसल्याने नागरिक वैतागले आहेत. याचा परिणाम असा होतोय की, संपूर्ण शहरभर कचऱ्याच्या भरलेल्या पिशव्या दिसून येत आहेत. हे टाळता येण्यासारखे नाही. बाजारपेठेत व निवासी ठिकाणी ठरलेल्या वेळेवर घंटा गाडी येत नसल्याने वैतागलेले नागरिक मग ते सुशिक्षित असो वा अशिक्षित ते जागा दिसेल तेथे कचरा फेकताना दक्ष ने निदर्शनास आणून दिलेले आहे. यावर नगरपालिका काय उपाय योजना करतेय याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
भाजपा आणि शिवसेना यांचे विळ्या भोपळ्याचे वैर नसेल ही मात्र सर्व साधारण सभेत जो गोंधळ दिसला हा लोकशाहीस मारक दिसला. शिवसेनेने सभागृहात बसून आपले लोकहिताचे विषय लावून धरायला पाहिजे होते. ते मंजूर झाले नसते किंवा विषय मांडण्यासाठी संधी मिळाली नसती तर गोंधळ घालायला काही हरकत नव्हती. परंतु सभेच्या अगोदरच विषय पत्रिका पाहून सभेवर बहिष्कार टाकला. यामुळे कोण बरोबर आणि कोण चूक हे न कळण्याइतकी जनता भोळी नाही.
भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी योग्य दिशा आणि वेळ समजून घेऊन पारदर्शी कामकाज नगरपालिकेत पाहावे याच साठी नागरिकांनी सर्वांना नगरपालिकेत नगरसेवकांच्या रूपात पाठविले आहे, याची जाण ठेवावी एवढीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे.
…. शब्दांकन @दत्ताजी जगताप
संपादक (Daksh Times 24Live)

