*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की लोणी मावळा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
साहित्य मिळताच विद्यार्थी आनंदीत .
पारनेर – लोणी मावळा येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ३० विद्यार्थ्यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या ज्ञानरचना सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य देण्यात आले . शैक्षणिक साहित्य मिळताच विद्यार्थी आनंदीत झाले .
शालेय शिक्षण घेणे व मिळणे , हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य व क्रमप्राप्त आहे , पण शैक्षणिक साहित्य घेणे , हे प्रत्येक विद्यार्थ्याला घरच्या आर्थिक अडचणी मुळे शक्य होत नाही , ती गरज ओळखून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ज्ञानरचना सामाजिक संस्थेच्या वतीने पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या लोणी मावळा येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी विदयालयात शिक्षण घेत असलेल्या ३० विद्यार्थ्यांना शालेय दप्तर , वह्या , कंपास पेटी व इतर शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले .
यावेळी संस्थेचे संचालक प्रविण साळवे यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की , संस्थेची स्थापना २०२३ मध्ये भारत सरकारच्या नियमांतर्गत करण्यात आली असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये , एकमेव या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली . याचबरोबर शैक्षणिक साहित्य संस्था , सामाजिक संस्थांना प्रशिक्षण देणे , आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्पदंश व त्यावरील उपाययोजनां वर उपाय योजना व जनजागृती कार्यक्रम , महिलांना शिलाई चे प्रशिक्षण , सामाजिक , व्यावसायिक , शैक्षणिक व इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात .
यावेळी भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ मावळे , सचिव नवनाथ शेंडकर , मुख्याध्यापक मच्छिंद्र राऊत , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव आणि ” दैनिक पोलीस न्यूज ” चे पारनेर तालुका प्रतिनिधी सुरेश खोसे पाटील , पत्रकार विकास शेंडकर , ज्ञानरचना संस्थेच्या संचालिका सुप्रिया मावळे , चौधरी , सारिका मावळे , सुनंदा मावळे , संचालक प्रविण साळवे , बाबासाहेब दौंड ,संतोष झरेकर , बाबाजी मावळे ,बाळासाहेब मापारी , हरिभाऊ जाधव , रघुनाथ पवार , सौ गुंड , अमृता लोंढे , आदिनाथ वाघ , विजय लाळगे , इतर मान्यवर , शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
[ चौकट –
भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ मावळे यांनी ज्ञानरचना संस्थेच्या कार्याचा गौरव केला . ]
[ चौकट –
सचिव नवनाथ शेंडकर सर यांनी ज्ञानरचना संस्थेने लोणी मावळा येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला . ]
[ चौकट –
मुख्याध्यापक मच्छिंद्र राऊत यांनी ज्ञानरचना संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेला संपर्क व त्यातून ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेल्या लोणी मावळातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्या बद्दल समाधान व्यक्त केले . ]
[ चौकट –
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव व आघाडी चे ” दैनिक पोलीस न्यूज ” चे पारनेर तालुका प्रतिनिधी सुरेश खोसे पाटील हे म्हणाले की , ज्ञानरचना संस्थेचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम चांगला आहे , पण साहित्य मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही मागील वर्षी मिळालेल्या गुणांपेक्षा या वर्षी जास्त गुण मिळवत , त्यात भर टाकावी , जेणेकरून संस्थेचा शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा हेतू सफल होईल . ]

