वटपौर्णिमा
धाराशिवप्रतिनिधी रत्नाकर पाटील यांच्याकडून
वटपौर्णिमा सण महान
पत्नी मागे पती जीवदान
करून पुजन वटवृक्षाचे
आयुष्य मागे पतीस दान…||१||
नऊवारी पैठणी शोभते
नाकात नथ मोत्याची
केसात माळून गजरा
मेंहदी रंगली प्रेमाची…||२||
हाती घेऊन पुजेचे ताट
सुहासिनी चालते वाट
वडाचे मनोभावे पुजन
धागा ती गुंडाळून दाट…||३||
जन्मोजन्मी पती हाच
मिळावा असे मनोरथ
औक्षवंत करून पतीस
सुखी संसार चाले रथ…||४||
कथा सत्यवान सावित्रीची
प्राचिन धार्मिक परंपरा देन
यमाच्या तावडीतून पतीस
सोडविले पतीव्रता महान…||५||
प्रदक्षिणा वटवृक्षा घालून
सौभाग्याचे औक्षण करून
पती हाच परमेश्वर मानून
सात जन्माची आस धरून….||६||
=======================
रत्नाकर बाबुराव पाटील
{सहशिक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता. जि.धाराशिव


