*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
*जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष लेखणीक ते जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी म्हणून कार्यरत राहून पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेच्या योजनांचा लाभ देणारे एक मार्गदर्शक अधिकारी म्हणून प्रभाकर लाळगे साहेब यांनी काम केले आहे. लेखणीक ते शाखाधिकारी तसेच तालुका विकास अधिकारी म्हणून काम करताना लाळगे साहेब यांनी खऱ्या अर्थाने बॅंकेच्या माध्यमातून सेवाभाव केला आहे. निघोज आणी परिसरातील विकासकामांसाठी योगदान देणारे एक युवा नेतृत्व म्हणून लाळगे साहेब हे चाळीस वर्षांपूर्वी परिचीत होते. मात्र पस्तीस वर्षांपूर्वी लाळगे साहेब हे जिल्हा सहकारी बँकेत लेखणीक म्हणून रुजू झाले. मात्र सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी ते पस्तीस वर्षे कार्यरत राहीले. पस्तीस वर्षांच्या सेवेनंतर लाळगे साहेब हे आज मंगळवार दि.३० जून रोजी तालुका विकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लाळगे साहेब यांनी खऱ्या अर्थाने कर्तव्य करीत सेवाभाव केला ही निघोज ग्रामस्थांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे . लाळगे साहेब यांना पत्रकार संघ, निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ तसेच तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा* 🌹🌹 सेवानिवृत्तीनंतर लाळगे साहेब यांना सेवाभाव करण्याची संधी मिळो यासाठी त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो तसेच सामाजिक सेवेसाठी माता मळगंगा देवीचा आशीर्वाद सातत्याने मिळो हीच मळगंगा मातेचरणी प्रार्थना 👏


