*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरडयांच्याकडून पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या उद्घाटनासाठी भारतीय जनता युवक मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज दादा महाडिक यांचा पारनेर तालुका दौरा संपन्न झाला त्यावेळी त्यांच्या शुभहस्ते भारतीय जनता पार्टी आळकुटी येथील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्ते निगोजेतील सचिन वराळ पाटील तसेच त्यांचे सर्व कार्यकर्ते आळकुटी येथील राहुल बापूसाहेब माने पाटील व त्यांचे सर्व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील जिल्ह्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी खासदार डॉक्टर निलेशजी लंके यांचा कार्यकर्ता वो विश्वासू नितीन अडसूळ कार्यक्रमात उपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष तालुक्यात मजबूत होताना दिसत आहे

