🚩भारतीय नरहरी सेना🚩
प्रणीतप्रसिद्धीप्रमुख अहिल्यानगर सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य मुकुंद निघोज कर यांच्याकडून 🌹सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य* 🌹
🚩अधिकृत जाहीर सूचना
समितीच्या हित, शिस्त, उद्दिष्टे आणि आचारसंहितेच्या अनुषंगाने सखोल आढावा घेतल्यानंतर समितीने खालील प्रशासकीय निर्णय तत्काळ प्रभावाने घेतले आहेत.
१. अॅड. विशाल वेदपाठक (माजी राज्य कायदेविषयक सल्लागार)
समितीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत गंभीर तक्रारी व विसंगती समितीच्या निदर्शनास आल्याने त्यांना त्यांच्या पदावरून पदमुक्त करण्यात येत आहे. आज दिनांक 08/07/2026 पासून त्यांचा समितीशी कोणताही अधिकृत संबंध राहणार नाही.
२. प्रथमेश नगरकर (माजी पुणे जिल्हाध्यक्ष)
समितीच्या नियम, शिस्त व उद्दिष्टांशी विसंगत वर्तनाबाबत प्राप्त झालेल्या बाबींचा विचार करून त्यांची समितीतून हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यांनी वैयक्तिक स्वरूपात केलेले अथवा भविष्यात करतील असे कोणतेही व्यवहार हे पूर्णपणे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे असतील. त्यांचा समितीशी कोणताही संबंध राहणार नाही.
३. सचिन बाणकर (माजी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख)
समितीच्या संघटनात्मक हिताला बाधा पोहोचेल अशा कारणांमुळे त्यांनाही त्यांच्या पदावरून पदमुक्त करण्यात येत आहे.
आज दिनांक 08/07/2026 पासून त्यांचाही समितीशी कोणताही अधिकृत संबंध राहणार नाही.
सर्व सराफ सुवर्णकार व संलग्न व्यवसायिक बांधवांना जाहीर आवाहन
दिनांक 08/07/2026 पासून वरील तिन्ही व्यक्तींचा सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्याशी कोणत्याही प्रकारचा अधिकृत संबंध नाही.
त्यांच्याशी भविष्यात होणारे कोणतेही वैयक्तिक, आर्थिक, व्यापारी किंवा कायदेशीर व्यवहार संबंधित व्यक्तींनी स्वतःच्या जबाबदारीवर करावेत. अशा व्यवहारांसाठी किंवा त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही वाद, दावे अथवा जबाबदाऱ्यांसाठी समिती कोणत्याही प्रकारे उत्तरदायी राहणार नाही.
सर्व बांधवांनी याची नोंद घ्यावी व समितीच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.
🚩काकासाहेब सुमन बाबुराव बुराडे संस्थापक अध्यक्ष
राष्ट्रीय भारतीय नरहरी सेना
— सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य
सचिव
गणेश दुर्गादास बनछोड


