*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या 23 वर्षां अंतर्गत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची शान पै. निलेश उचाळे हा 82 किलो वजनगटात देशात तृतीय क्रमांक (ब्राँझ मेडल) मिळवून महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर झळकवले पैलवान निलेश उचाळे हा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिरापूर तालुका पारनेर या गावचा असून तो गुरुकुल कुस्ती संकुल भाळवणी एन.आय.एस. कुस्तीपंच पै. गणेश जाधव सर यांच्याकडे सराव करत असून सध्या सीताई कला विज्ञान महाविद्यालय (कुरकुंडी) घारगाव ता.संगमनेर येथे पदवी शिक्षण घेत आहे निलेशने आपल्या गावाचे जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्र राज्याचे नाव देश पातळीवर सुवर्ण अक्षराने कोरले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यातील कुस्ती शौकिनांकडून तसेच सर्व स्तरातील जनतेकडून निलेशचे कौतुक होत आहे त्याने यापुढे भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचा तिरंगा उंचीवर न्यावा ही सर्व जनतेकडून अपेक्षा आहे.


