*श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रसिद्ध प्रमुख ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर सविस्तर वृत्त असे की माता मळगंगेच्या पावन अशा भूमीमध्ये श्री मळगंगा ग्रामीण कार्याध्यक्ष माननीय श्री वसंतरावजी बाबासाहेब कवाद व त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ उपाध्यक्ष माननीय अमृत शेठ रसाळ तसेच सर्व सल्लागार यांच्या सातत्याने प्रयत्ना मुळे निघोज व निघोज परिसरासाठी माता मळगंगेच्या आशीर्वादामुळे निघोज येथे खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे यापूर्वीही श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांनी गावातील सर्व मंदिरे ट्रस्टच्या माध्यमातून विकसित केले आहे तसेच निघोज स्मशानभूमी मध्येही त्यांनी चांगल्या प्रकारे हातभार लावून सुसज्जता आणली आहे भाविकांच्या सोयीसाठी त्यांनी हाती घेतलेल्या अन्नदाना ला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि लोकांच्या सहकार्यातून अनेक देणग्यामिळाल्या आहेत व अवघ्या वीस रुपयांमध्ये सर्व भाविकांसाठी अतिशय उत्कृष्ट असे जीवन त्यांनी उपलब्ध करून दिले आहे त्याबाबत लोक खुश आहेत देणगीचा ओघचालू आहे त्यामुळे अन्नदान मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच कुंडक्षेत्र येथे त्यांनी मागील एक दीड वर्षांपूर्वी विसावा हॉल उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वसामान्यांची लग्नकार्य तेथे होत आहेत आता त्यांच्या श्री मळगंगा ग्रामीण ट्रस्ट माध्यमातून लोकांच्या मागणीनुसार ओपन गार्डन उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे थोड्या दिवसात लोकांना याही सुविधेचा लाभ मिळणार आहे या सर्वांमध्ये निघोज ग्रामस्थ मुंबईकर मंडळ तसेच विविध संघटनांनी सातत्याने मदत केल्यामुळे ही कार्य होऊ शकले आहे त्यांच्यातून उत्तरोत्तर अशाच प्रकारे कार्य करावे अशीच जनमानसात मागणी आहे त्यांनी कुंडक्षेत्री सर्वांच्या सहकार्याने अनेक वृक्षांची ही लागवड केलेली आहे खडकाळ क्षेत्र असूनही बरेचसे वृक्ष त्यांनी लावले आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये लोकांना त्याचाही लाभ होत आहे त्याही ठिकाणी नवरात्र मध्ये कुंडक्षेत्री मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव होत असतो नवरात्र उत्सव मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे तेथे मोठ्या प्रमाणात आरती विविध बक्षिसे अन्नदान हाही उपक्रम चालू आहे एकंदरीत श्री मळगंगा मातेच्या आशीर्वादाने उत्तरोत्तर अशाच प्रकारे प्रगती होत जावी स्वर्गीय बाबासाहेब कवाद यांच्या प्रेरणेतून सर्व श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट सातत्याने प्रयत्न आहे त्यांच्या प्रयत्नाला सुयशलाभो व गावामध्ये उत्तरोत्तर विकास कामे व्हावी हीच जन माणसाची अपेक्षा आहे ही माहिती श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट सचिव माननीय श्री शांताराम कळसकर यांनी पत्रकार दिले आहे आपणही माता मळगंगेच्या दर्शनाचा लाभ घेऊन कृपाशीर्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे





