ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे मंगळवार दिनांक तीन नंबर रोजी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे पारनेर तालुका अहिल्यानगर जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते या निवडणुकीमध्ये खासदार डॉ. निलेश लंके साहेब यांनी सोसायटी मतदार संघामध्ये 104 पैकी 64 मतांनी विजय मिळवला त्यांचे प्रतिस्पर्धी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राहुल शिंदे यांना पराभव पत्करावा लागला अतिशय निवडणुकीमध्ये निलेशजी लंके यांनी जी बाजी मारली त्यामुळे निघोजो परिसरात अतिशय जल्लोष निर्माण झाला आनंदाच्या वातावरणात स्वतः खासदार साहेब हजरराहून माता मळगंगेचा कृपा आशीर्वाद घेतला संपूर्ण परिसरातील लोक मिरवणुकीसाठी आले होते या आनंद मिरवणुकी द्वारे मी सांगितल्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्हा बँकेत प्रवेश करणारच आणि तो झाला सर्वसामान्य कार्यकर्ता जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक झाला असे गौरव उद्गार माननीय खासदार डॉ. निलेश लंके यांनी व्यक्त केले पुढील काळात बँकेच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे सांगितले त्यांचे संपूर्ण परिसरातील तालुक्यातील कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते


