*पारनेर तालुका प्रतिनिधी लक्ष्मण जवक यांच्याकडून
// जन्म तिथे मृत्यू आहेच//
महाराष्ट्राच्या तमाशा क्षेत्रातील अतिशय ,कमी उंचीचा .एक तुफान सोंगाड्या. आणि अलाउन्सर ,कै.सचिन रामचंद्र जाधव. आज काळाच्या पडद्याआड…..
कैलासवासी सचिन रामचंद्र जाधव उर्फ (गंगाराम) मुक्काम, पोस्ट, मेढा .तालुका .जावळी जिल्हा .सातारा. त्यांच्या आईचे नाव फुलाबाई. ते youtube चे अतिशय नाविन्यपूर्ण ,कलावंत होते. त्यांचा आवाज अतिशय कणखर असून, अभिनय आणि कामाची अदाकारी, ही काही वेगळीच असायची….त्यांनी बायनाबाई, आणि शारदाबाई सातारकर. या तमाशामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम केले. त्याचप्रमाणे शकुंतलाबाई चव्हाण नगरकर. याही तमाशात काम करून प्रसिद्धी मिळवली…
त्यांचे वय ४० वर्ष असून, त्यांनी२५ वर्ष ,
रसिकांची सेवा केली. आणि अशा या महान कलावंताचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो ……
हीच शाहीर खंदारे. यांच्या कुटुंबीयांकडून शेवटची श्रद्धांजली…,…
लेखक.
शाहीर खंदारे.
तालुका नेवासा..


