*निघोज मध्ये गेली तेरा वर्षापासून संदीप पाटील वराळ फाउंडेशन यांच्यामार्फत गोरगरिबांची दिवाळी साजरी केली जाते त्यामध्ये गोरगरीब गरजू महिलांना साडी वाटप तसेच कन्हैया उद्योग समूहामार्फत कैलासवासी शांताराम मामा लंके यांच्या प्रेरणेतून गरिबांसाठी श्रीखंड वाटप केले जाते त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असून गावच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला त्यांची चिरंजीव कन्हैया उद्योगसमूहाचे अध्यक्ष माननीय मच्छिंद्र शांताराम लंके साहेब ही पावलावर पाऊल टाकून सामाजिक कामात नेहमीच सहभाग घेतात तसेच निघोज गावातील पत्रकारांना त्यांच्यामार्फत मिठाई वाटप केली जाते याही वर्षी त्यांनी पत्रकार बांधवांना मिठाईचे वाटप केले पत्रकार बांधवांच्या तर्फे त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले व आपल्या आतून अशाच प्रकारे गावची तालुक्याची व जिल्ह्याची सेवा घडो असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर मुकुंद रामचंद्र निघोजकर यांनी यावेळी बोलताना केले दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माननीय सचिन भाऊ वराळ व परिवार तसेच संदीप पाटील वराळ फाउंडेशन मार्फत व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या सहकार्यातून ते दरवर्षी मोठ्या प्रमाणात गोरगरिबांची दिवाळी हा उपक्रम चालवीत आहेत याही वर्षी त्यांनी सोमवार दिनांक 10 रोजी हा उपक्रम साजरा केला अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या उपक्रमाबाबत दोनही समूहाचे कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिरूर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार पोपटरावजी गावडे होते तसेच कन्हैया उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय मच्छिंद्र शेठ लंके साहेब यांच्या शुभहस्ते गोरगरिबांना साडी व खाऊचे वाटप करण्यात आले अतिशय आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता



