*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून
अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी व संघटन करण्यासाठी केरु दादा वैरागर यांचे योगदान मोठे असून एक समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा निघोज परिसरात नावलौकिक असल्याचे प्रतिपादन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष तथा बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण सहकारी संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद सर यांनी व्यक्त केले आहे. केरू दादा वैरागर यांच्या १० व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील वराळ, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ताजी उनवणे, ज्येष्ठ पत्रकार भगवान श्रीमंदीलकर, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बाबाजी वाघमारे ,
वडझिरे गावचे पोलीस पाटील वसंतराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, उपसरपंच माऊली उर्फ ज्ञानेश्वर वरखडे, माजी उपसरपंच उमेश सोनवणे,मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे, ॲड. गणेश लाळगे , बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक बाबाजी कळसकर, संचालक सतिश साळवे यांच्या हस्ते वै.केरु दादा वैरागर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बाळासाहेब महाराज साळवे यांचे किर्तन झाले. साळवे महाराज यांनी यावेळी किर्तनरुपी मार्गदर्शन करताना सांगितले की केरु दादा वैरागर यांनी संसार करताना परमार्थ मोठ्या प्रमाणात केला आहे. समाजाकरीता दादांनी मोठ्या प्रमाणात त्याग केला आहे. ही त्यागमय भावना प्रत्येकाच्या अंगी असणे आवश्यक आहे. देवाने आपल्याला जिवण दिले त्याचा फायदा विठूनामाचा गजर व संत सेवा तसेच सामाजिक सेवेसाठी केला तरच जिवण सार्थकी लागत असते केरु दादांचे जिवण कृतार्थ झाले आहे. पत्रकार संपतराव वैरागर, अंगणवाडी सेविका पुष्पा वैरागर व दादांचा नातू अर्जुन वैरागर, दादांचे सोयरे जी एस महानगर बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी पंढरीनाथ साळवे यांनी हा १० वा पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रम ठेऊन जगाला एक धार्मिक संदेश दिला असल्याचे प्रतिपादन साळवे महाराज यांनी व्यक्त केले आहे. यावेळी पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव ॲड. सोमनाथ गोपाळे, पत्रकार दत्तात्रय लंके, पत्रकार व प्रेस फोटोग्राफर जयसिंग लंके, पत्रकार दत्ता गाडगे, सलीमभाई हावलदार, युवा नेते रमेशशेठ वरखडे, बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे वरिष्ठ अधिकारी सुनिलजी तांबे साहेब, संदीप ढवळे, मोहन साळवे तसेच बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे पदाधिकारी व सदस्या आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार भगवान श्रीमंदीलकर यांनी केले. शेवटी पत्रकार संपतराव वैरागर, पुष्पा वैरागर, अर्जुन वैरागर, बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक सतिश साळवे यांनी आभार मानले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थीतांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.



