पारनेर तालुका प्रतिनिधी सुपा विभाग लक्ष्मण जवक यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की पारनेर तालुक्यातील सोसायटी मतदार संघात अहिल्यानगरचे खासदार डॉ निलेश जी लंके विरुद्ध विखे गटाचे कट्टर समर्थक माननीय श्री राहुलजी शिंदे यांच्यात मुख्य लढत असून या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहेत दोन्ही गट आपापल्या पद्धतीने प्रयत्नात असून विजय आमचा असे म्हणत आहे परंतु या निवडणुकीबाबत ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर यांनी अतिशय चुरशीची लढत होऊन यामध्ये विजयी उमेदवार अतिशय कमी मतानेयेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्राचे भाग्यविधाते माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे कट्टर समर्थक खासदार डॉक्टर निलेश लंकेत्यांच्याही मागे सभापती राम शिंदे साहेब यांची ताकद उभी आहे तसेच खासदार साहेब यांनी आपल्याकडे 40 ते 45 मतदार हक्काचे आहेत असे सांगितले आहे त्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे पारनेर तालुक्याचे आमदार माननीय काशिनाथ दाते सर यांनी यापूर्वीच राहुल शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून देण्यात येणार आहे असे स्पष्ट केले होते तसेच निवडणुकीच्या रिंगणात ही त्यांना पाठिंबा दिला होता पारनेर तालुक्यातील आमदार माननीय दाते सर यांनी तसेच महानगर बँकेचे अध्यक्ष गीतांजलीताई शेळके यांनी माघार घेतल्यामुळे त्याही कोणाला मदत करतात याकडे पाहिले जाते एकंदरीत होणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन नोव्हेंबरला मतदान होत असल्यामुळे दोन्ही पक्ष आपापल्या परीने प्रयत्न आहेत





