ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की दोन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक मतदान होणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे या निवडणुकीमध्ये 11 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत बाकीच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होत असून प्रामुख्याने डॉ. खासदार निलेश लंके यांनी कोणत्याही परिस्थितीत बँकेत प्रवेश करणार असे मागे जाहीर केल्यामुळे ते निवडणूक रिंगणात उभे आहेत पारनेर तालुक्यातील सोसायटी मतदार संघामध्ये खासदार निलेशजी लंके साहेब विरुद्ध राहुल जी शिंदे यांच्यात खरी लढत होणार असून या लढतीकडे सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे लक्ष लागले आहे खासदार साहेबांसाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक मानली जाते त्यांनी एक प्रकारे चंग बांधला असून माझ्याकडे जवळजवळ 45 46 मतदार आहेत असे सांगत आहे तसेच या इलेक्शन मध्ये मला काहीही अवघड न जाता आम्ही निवडूनच येईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत ही निवडणूक पारनेर तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार असून जिल्हा बँक ही कामधेनू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य त्या प्रतिनिधीची निवड होणे गरजेचे आहे असे लोकांच्या वाटते लोकांच्या मतानुसार या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होईल यावर शेतकऱ्यांना बँकेकडून दिलासा मिळणार आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता दोन्हीही गट विखे थोरात तसेच शरदचंद्रजी पवार साहेब व त्यांचे सहयोगी पक्ष यामध्ये कोणती भूमिका घेतात याकडे प्रामुख्याने पाहिले जाते या निवडणुकीमध्ये पारनेर तालुका आमदार साहेब काशिनाथ दाते सर व गीतांजली ताई शेळके यांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीकडे राहुल शिंदे यांच्यासाठी प्रयत्न होतील तसेच राहुल शिंदे हे बीजेपी कार्यकर्ते असून त्यांची नामदार विखे पाटलांवर खूप असे श्रद्धा आहे ते त्यांचे कट्टर कार्यकर्ते असून त्यांना ही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असताना दिसत आहे एकंदरीत आमदार साहेबांनी यापूर्वीच राहुल शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सुतवाच्य केले होते त्यामुळे या निवडणुकीत फार मोठी रंगत होणाऱ् असे चित्र दिसत आहे महाराष्ट्रावर दुष्काळाचे फार मोठे संकट आल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी असेच जनतेतून बोलले जात होते परंतु राजकीय वातावरणामुळे व मतभेदामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही



