शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र नगर यांच्याकडून
शिरूर येथे महाराष्ट्र राज्य मराठा पत्रकार संघ, शिरूर तालुका यांच्या वतीने शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ धाडीवाल होते. शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष नीतीश गादिया आणि सिनेअभिनेते सुनील गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सिनेअभिनेते सुनील गोडबोले यांना उत्कृष्ट सिने रत्न पुरस्काराने, तर तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक रामदास राऊत यांना उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रकाश शेठ धाडीवाल यांनी पत्रकार संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सिनेअभिनेते सुनील गोडबोले यांनी पत्रकार संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी रामदास राऊत यांच्यामुळे मिळाल्याचे सांगत त्यांनी त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अर्जुन बडे यांनी केले. सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले, तर आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी मानले.
या कार्यक्रमाला मा, सरपंच विठ्ठल घावटे, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत माननीय स्वप्नील ढमढेरे, जिल्हा दुध, पुणे, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


