सराफ सुवर्णकार संरक्षण समिती अहिल्यनगर 🚩 डोंगराळे प्रकरणात यज्ञा बाळाला न्याय मिळाला! 🚩
⚖️ न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय — आरोपीला फाशीची शिक्षा!
🙏सराफ सुवर्णंकार संरक्षण समिती च्या सत्यासाठी संघर्ष, न्यायासाठी एकजूट! 🙏
जय महाराष्ट्र! जय शिवराय! जय नरहरी!
*ज्येष्ठ पत्रकार तथा सराफसुवर्णकार संरक्षण समिती अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
*मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुरडी यज्ञा बाळा हिला न्याय मिळावा, यासाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते*
या घटनेतील पीडित बालिकेला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यभरातील विविध ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदने देऊन न्यायाची मागणी करण्यात आली होती.
आज माननीय न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची बातमी ही न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे.
✊ ही केवळ एका मागणीची पूर्तता नाही, तर अन्यायाविरोधात एकजुटीने उभे राहण्याच्या निर्धाराला मिळालेली ताकद आहे!
या न्यायलढ्यात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि न्यायाची मागणी करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
आपल्या सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या एकजुटीने, पाठपुराव्याने आणि लोकशाही मार्गाने केलेल्या प्रयत्नांनी या प्रकरणात न्यायाच्या मागणीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
🙏 यज्ञा बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली!
💐 न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आमचा निर्धार एकच — अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मार्गाने संघर्ष करायचा आणि समाजात न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करायचा!
🚩 सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य
एकजूट अभेद्य, हक्क अढळ, संरक्षणासाठी सदैव सज्ज!
जय महाराष्ट्र! जय शिवराय! जय नरहरी! जय संविधान! 🚩
डोंगराळेप्रकरण #यज्ञालान्याय #सराफसुवर्णकारसंरक्षणसमिती #न्यायासाठीएकजूट #अन्यायाविरोधातसंघर्ष #जयसंविधान



