*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर प्रसिद्धी प्रमुख श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट समस्त ग्रामस्थ रामरात्र उत्सव मंडळ कुंड क्षेत्र तसेच मुंबईकर मंडळ श्री मळगंगा यात्रा कमिटीव सर्वांच्या सहकार्याने याही वर्षी नवरात्र उत्सव अतिशय दिमाखा त व थाटामाटा साजरा करण्यासाठी सर्वांची लगबग चालू आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानदेव नामदेव लंके साहेब यांनी यावर्षी देवीच्या विद्युत रोषणाईसाठी जवळजवळ एक लाख रुपये खर्च करण्याचे ठरवले असून त्याप्रमाणे तयारी चालू आहे श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टमार्फत अनेक उपक्रम चालू असून याही वर्षी कुंड क्षेत्र तसेच गावातील मंदिर परिसरात भाविकांसाठी जास्तीत जास्त सोयीसुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कन्हैया ज्वेलर्स निघोज यांच्यामार्फत सायंकाळची आरती झाल्यानंतर देवीच्या मंदिरात सुवासणीला लकी ड्रॉ द्वारे पैठणी साडी भेट म्हणून देण्यात येत आहे अनेक भाविक भक्त देवीची ज्योत आपल्या गावातील मंदिरात नेण्यासाठी निघोज ला येऊन जातात व आपापल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो तसेच अनेक भाविक भक्त नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात व आनंदी होतात त्याप्रमाणे पोलीस दुरक्षेत्र यांच्याहीमार्फत चांगल्या प्रकारे सुविधा देण्यात येते अशा प्रकारे आपणही सर्वांनी माता मळगंगेच्याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती श्री मळगंगा ग्रामीण विकास चे कार्याध्यक्ष माननीय श्री वसंतरावजी कवादसर उपाध्यक्ष अमृता शे ठ रसाळ तसेच सचिव श्री शांताराम कळस्कर साहेब यांनी दिली आहे


