📌दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार काशिनाथ दाते सरांचा संवेदनशील पुढाकार
महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी असा आदर्श घेतला तर महाराष्ट्रात दुष्काळ शिल्लक राहणार नाही फार मोठा हातभार लागेल
एक महिन्याचे १ लाख ८० हजार २०० रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द
दुष्काळाच्या संकटात शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आमदार काशिनाथ दाते सरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी आपल्या एका महिन्याच्या मानधनाचा १,८०,२०० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला.
जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, संकटाच्या काळात मदतीचा हात देणे आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच आमदार दाते सरांच्या कार्याची खरी ओळख
🎯लोकसेवा केवळ शब्दांतून नव्हे, तर कृतीतून



