बालकविता दुय्यम दर्जाची मानू नये
ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नाना ढवळे यांचे प्रतिपादन
*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर यांच्याकडून
कविता प्रौढांसाठी की बालकांसाठी हे महत्त्वाचे नाही. मुळात ती कविता असणे आवश्यक असते. मी या माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. म्हणून माझ्या बालकविता इथल्या मुलांपुढे सादर करताना मला विशेष आनंद होत आहे.
मुलिकादेवी माध्यमिक विद्यालय, निघोज येथे कवी आपल्या भेटीला या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि बालकवी नाना ढवळे बोलत होते. त्यांनी आपल्या प्राण्यांची शाळा या बालकविता संग्रहातल्या निवडक कविता मुलांपुढे सादर केल्या.
ढवळे पुढे म्हणाले, बालकांच्या भावविश्वात जाऊन नादलयबद्ध , शक्यतो जोडाक्षर विरहित कविता लिहिणे जरुरी असते. बालकांसाठी सोपी कविता लिहिणे अवघड असते. या संग्रहातल्या बालकविता आधी मुंबईच्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आदी नामांकित वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या आहेत. प्राण्यांची शाळा हे पुस्तक त्यांचे केवळ संकलन मात्र आहे.
प्राण्यांची शाळा या बालकविता संग्रहाची एक प्रत ढवळे यांनी विद्यालयाला सप्रेम भेट म्हणून दिली.
ढवळे यांना शाल, श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या निर्मला सोबले या होत्या.
या कार्यक्रमाला प्राचार्या मनिषा गाडगे, राजेंद्र गोरखे, बाबाजी शिंदे, दादा ठवाळ, अरुण काळे, सुनिल औटी, अनिता काळे, राहुल भालेकर, अनिल घरदे, श्री खान, सबाजी बेलोटे, संगीता दिघे, बालिका सोनवणे, इनामदार मॅडम, मेहबूब इनामदार, श्रीमती कांबळे आदी शिक्षक व कर्मचारी वृंद कार्यक्रमाला उपस्थित होता.
विद्यार्थ्यांचा चमू मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर काकडे यांनी तर प्रास्ताविक जयवंत पुजारी यांनी केले. आभार प्रदर्शन पुष्पाताई वराळ यांनी केले.



