ज्येष्ठ पत्रकारडॉ. मुकुंद निघोजकर यांच्याकडूनभोंडला (हादगा / भुलाबाई)**सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव फाकटकरभोसरी यांच्या संकलनातून
नवरात्र सुरू झाले की स्त्रीयांना आठवण येते ती भोंडल्याची. विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रिया आणि कुमारिकांचा भोंडला हा एक पारंपरिक सांस्कृतिक उत्सव आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रांत (हस्त नक्षत्रात) हा साजरा केला जातो. विदर्भात याला ‘भुलाबाई’ म्हणतात.
एका पाटावर हत्तीचे चित्र / प्रतिमा ठेवून त्यावर फुलांचा हार घालून त्या हत्तीची पूजा केली जाती.
पाटाभोवती स्त्रिया आणि मुली फेर धरून पारंपरिक भोंडल्याची गाणी म्हणतात. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन, अशा क्रमाने रोज एक-एक गाणे वाढवले जाते. मूळ गाणी सोळा आहेत. ‘ऐलमा पैलमा गणेश देवा…’ या गाण्याने भोंडल्याची सुरुवात होते. भोंडला संपल्यानंतर खिरापत वाटतात. परंतु अगोदर ती खिरापत काय असेल हे ओळखायचे असते. ती ओळखल्या नंतर हत्तीला आणि देवीला नैवेद्य दाखवून ती सर्वांना वाटतात.
निसर्गाची कृपा होऊन चांगला पाऊस पडावा, उत्तम पीकपाणी यावे व सर्वत्र सुख, समृद्धी नांदावी हा उद्देश असतो.




