डिजिटल युगाबरोबर पतसंस्थांनी बदलणे गरजेचे : दिलीप वळसे पाटील*आंबेगाव प्रतिनिधी श्री गावडे यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे १०१ मुलींना शालेय साहित्याचे वाटप
घोडेगाव : डिजिटल युगात वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीनुसार पतसंस्थांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कामकाजात आवश्यक बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी केले.
घोडेगाव येथील अग्रगण्य श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजनेअंतर्गत १०१ मुलींना दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. पुरुषोत्तम खंडू भास्कर होते.
यावेळी निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव वळसे पाटील, आंबेगाव तालुक्याचे सभापती कैलासबुवा काळे, बाजार समितीचे माजी संचालक सखाराम पाटील काळे, घोडेगावच्या माजी सरपंच क्रांती गाढवे, अनुसया महिला उन्नती केंद्राच्या संचालिका ज्योती घोडेकर, पतसंस्थेच्या संचालिका रत्नाताई गाडे, शरद बँकेचे संचालक संजय आर्वीकर, बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक गोविंदआप्पा घोडेकर, नामदेव शेठ भास्कर, सुनील आकले, स्वप्निलजी भास्कर, दत्तात्रय वऱ्हाडी, महादेव शेठ घोडेकर, तुकारामदादा झोडगे, दीपक घोडेकर, बाळासाहेब घोडेकर, उपसरपंच स्वप्निल घोडेकर, शरदभाऊ झोडगे, विठ्ठल महाराज करवंदे, किसनबुवा भास्कर, अभिजित कुदळे, ग्रामपंचायत सदस्य पप्पू घोडेकर माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश घोडेकर, निलेश रामदास घोडेकर, जनार्दन कोरडे, भगवान भास्कर समीर झोडगे संदेश भास्कर साहिल भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पतसंस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, सभासद तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१०१ मुलींच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार
सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून १०१ मुलींना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमामुळे मुलींना शैक्षणिक वाटचालीसाठी मदत मिळणार असून, सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्थेचा प्रयत्न या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पुरुषोत्तम भास्कर यांनी केले



