पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की आळकुटी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री संजयजी मते यांनी आळकुटी तालुका पारनेर येथे साईनाथ विद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांच्या मदतीने स्वतः 100 वृक्षाची उपलब्धता करून आळकुटी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार व अभिनंदन केले आहे ते एक वृक्षप्रेमी असून नेहमीच त्यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असतो त्यामुळे त्यांचे जेष्ठ पत्रकार व लोक परिवर्तन दैनिकाचे कार्यकारी संपादक डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे

