निघोज प्रतिनिधी —
जयवंतराव कवाद यांनी निघोज गावाला घरोघरी कावडीने पाणी दिल्याचे ऐकून मन स्तब्ध झाले —
आमदार काशिनाथ दाते सर ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर आज कडून
निघोज व्यापारी असोसिएशन पदाधिकारी मोहनशेठ कवाद, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, शिवव्याख्याते प्रा.ॲड. ज्ञानेश्वर कवाद सर व सौ.संगिता मच्छिंद्रनाथ गांडाळ यांचे वडील जयवंतराव मारुती कवाद यांचे शुक्रवार दि.३० रोजी वृद्धापकाळाने वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झाले.कवाद कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते सर आले असताना ते म्हणाले,मी कवाद कुटुंबाचे माहिती घेत असतानी अत्यंत खडतर परिस्थितीत जयवंतराव कवाद यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित असतानी कष्टा शिवाय यश नाही हा कानमंत्र त्यांनी आपल्या कुटुंबाला दिला .कडक स्वभावाचे असले तरी अतिशय कष्टप्रद जिवन जगत असताना कुटुंबाबरोबर समाजातही मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे.निघोज गावाला सार्वजनिक पाणीपुरवठा नळ योजनेची सुविधा नसतानी संपूर्ण गावला कावडीने घरोघरी पाणी देण्याचे पुण्याचे काम केले.यामध्ये त्यांना आपल्या पत्नी यमुनाबाई कवाद यांनी ही खंबीर साथ दिली.कवाद कुटुंबाचे सामाजिक, शैक्षणिक ,धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे यावेळी आमदार श्री.काशिनाथ दाते सर म्हणाले.
यावेळी भाजपचे पदाधिकारी वसंतराव चेडे ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला कार्याध्यक्ष सौ.सुधामतीताई कवाद, मळगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठलशेठ कवाद, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिलजी शेटे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी रोहिदास लामखडे, उद्योजक मोहनराव खराडे , प्रगतीशील शेतकरी सुभाषराव ढवळे, सुहास लंके, दिपक लंके ,अक्षय कवाद,अँड.तेजस कवाद, अभिजीत कवाद,आदित्य कवाद,रूपेश गांडाळ,सुरज गांडाळ, मनोज डेरे, कुणाल डेरे सत्यम कवाद,शिवम कवाद,गौरव कवाद हे उपस्थित होते.
चौकट —
जयवंतराव कवाद यांचा भुतकाळ व आजचा कवाद कुटुंबाचा वर्तमानकाळ यामध्ये मोठा बदल झाला आहे.त्यांची मुले व नातवंडे चांगल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.कष्टाशिवाय यश नाही हा त्यांचा वारसा सर्व कवाद परिवार यशस्वीरित्या चालवत आहेत.जुन्या पिढीतील अशा व्यक्तीमत्वाला भेटण्याचे राहुन गेले ही खंत कायम मनात राहील.
आमदार काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य पारनेर नगर मतदार संघ)
