ढवळे मळा, निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर
श्री काळभैरवनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा
श्री मुकुंद निघोजकर ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडून
भयापासून रक्षण करणारी, कालावरही मात करणारी देवता म्हणजे काळभैरव. ही शंकराचे उग्र रूप आहे. ही क्षेत्रपाल देवता असून हिच्या हातात दंड आहे.
निघोज येथील ढवळे मळ्यात २१ फेब्रुवारी शनिवार ते २२ फेब्रुवारी रविवार या काळात श्री काळभैरवनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे.
ह.भ.प.अनिल महाराज तुपे (नाशिक) यांचे २१ फेब्रुवारी शनिवारी रोजी रात्री ७ ते ९ या वेळेत हरिकीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
२२ फेब्रुवारी रविवार रोजी ह.भ.प. राजेशदादा सारंग यांच्या शुभ हस्ते होमहवन विधी पार पडणार आहे. ह.भ.प. डॉ नारायण महाराज जाधव (आळंदी देवाची) यांच्या शुभ हस्ते कलशारोहण विधी संपन्न होणार आहे.
ह.भ.प. डॉ नारायण महाराज जाधव यांची २२ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी १०.३० ते १२.३० यावेळी कीर्तनसेवा सादर होणार आहे. या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
या सोहळ्याच्या कार्यक्रमात २१ फेब्रुवारी शनिवारी रात्री ९ ते११ या वेळेत कन्हैया भजनी मंडळ, पठारवाडी आणि २२ फेब्रुवारी रविवार रात्री ८ ते १० या वेळेत श्रीराम भजनी मंडळ, निघोज यांच्या सुश्राव्य भजन गायनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आलेला आहे.
सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे भैरवनाथ देवस्थान, ढवळे मळा यांनी आवाहन केले आहे.
