नामदार विखे पाटील,माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रयत्नातून निघोजसाठी दिड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध.
ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून
निघोज आणी परिसरातील जनतेचा स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी निघोज गावांसाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत परिसरामध्ये घनकचरा, सांडपाणी,व मैलागाळ प्रकल्प व्यवस्थापन साठी राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रयत्नातून दिड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी दिली आहे. निघोज व परिसरातील लोकसंख्या पंचवीस हजार असून स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावर ग्रामपंचायतने विविध उपक्रम राबवून स्वच्छता अभियान सातत्याने राबवीले आहे. मात्र लोकसंख्या वाढ लक्षात घेता या ठिकाणी घनकचरा, सांडपाणी,मैलागाळ व्यवस्थापन हा प्रकल्प होणे गरजेचे आहे यासाठी या तीनही मान्यवरांकडे हा प्रस्ताव सादर केला होता. यासाठी मोठ्या प्रमाणात विखे पाटील व दाते सर यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी दिड कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार असून तालुक्यातील निघोज सारख्या मोठ्या गावचा स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची माहिती वराळ पाटील यांनी दिली आहे. यासाठी महायुती पक्षातील तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांनी सहकार्य केले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
