सविस्तर वृत्त *श्री क्षेत्र कुंड पर्यटन स्थळ येथे मळगंगा मंदिर परिसरात स्वच्छता व्हावी या उद्देशाने बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कचराकुंड्या सप्रेम भेट देण्यात आल्या बद्दल श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तर्फे बाबासाहेब निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री भिवाशेठ रसाळ व व्यवस्थापक श्री दत्तात्रय लंके यांचा मळगंगा ट्रस्टचे माजी कोषाध्यक्ष ॲड. श्री बाळासाहेब लामखडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानप्रसंगी मळगंगा ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्री वसंतराव कवाद सचिव श्री शांताराम कळसकर विश्वस्त श्री शंकरराव लामखडे, पतसंस्थेचे संचालक श्री बाबाजी कळसकर व इतर मान्यवर उपस्थित अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख श्री मळगंगाग्रामीण विकास ट्रस्ट निघोज मुकुंद निघोज करयांनी ही माहिती दिली
