*धाराशिव प्रतिनिधी श्री पाटील यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
======================= हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ मॉंसाहेब यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी १५९८ रोजी झाला. लखोजी जाधव व म्हाळसाबाई यांच्या परिवारात कन्यारत्न जन्मले. नाव तिचे जिजा ठेवले. जिजाऊ लहानपणी हुशार व साहसी होती. घोडेस्वारी, दानपट्टा ,तलवार चालवायला शिकली. धाडसी व बाणेदार स्वभाव , दिसायला सुंदर व्यक्तीमत्व . तरूण वयात जिजाऊचे शहाजी राजे भोसले यांच्या बरोबर इ. स. १६०५ मध्ये दौलताबाद येथे थाटामाटात विवाह संपन्न झाला. लग्नानंतर शहाजी राजांनी जिजाऊला शिवनेरी किल्ल्यावर रहाण्यास आणले.शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. किल्ल्यावर शिवाई देविचे मंदिर असल्यामूळे बाळाचे नाव शिवाजी ठेवले. जिजाऊने बाळ शिवबाला रामायण, महाभारत व वीर लोकांच्या साहस पूर्ण कथा सांगितल्या. शिवबाला साहसी व धाडसी कार्याचे बाळकडू बालवयात मिळाले. मॉंसाहेब जिजाऊने बाळ शिवबाला तलवार चालवणे, दानपट्टा फिरवणे, घोडेस्वारी व किल्ले बांधणे या महत्वपूर्ण कार्याचे शिक्षण दिले.
गनिमी काव्याने शत्रूवर हल्ला कसा करावा हे शिक्षण दिले.
*”जिच्या हाती पाळण्याची दोरी, जगा ती उद्धारी*”
बाणेदार स्वाभिमानी मॉंसाहेब जिजाऊ च्या प्रेरणेने शूर शिवाजी महाराज हे राजे छत्रपती झाले . जिजाऊ एक आदर्श नारी होत्या. तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यावर त्याची डागडुजी करीत असताना सुवर्ण मुद्रा व सुवर्ण मुर्ती सापडली. शिवरायांनी मातोश्री ला विचारले.मुर्तीचे काय करावे…?त्यावेळी जिजाऊ म्हणाल्या देवी देवतांच्या मुर्ती देवघरात ठेवून त्याचा स्वराज्यासाठी काय उपयोग…? देवी देवतांची पूजा करून स्वराज्य उभे करता येत नाही.स्वराज्य स्थापन करणं हेच देवी देवतांचे पुजन आहे.कर्तव्य हाच आपला धर्म आहे.ध्येयासाठी अविरत प्रयत्न हीच खरी पूजा. मानवता,माणुसकी जपली पाहिजे.रयतेला जपलं पाहिजे. सुवर्णमुर्ती वितळवून त्याचा पैसा रयतेच्या कामी लावा. या जिजामातेच्या क्रांतिकारी विचाराला सलाम. ज्यांनी शिवबा सारखा शूरवीर योद्धा घडवून महाराष्ट्र राज्याचे रक्षण केले. राजमाता, राष्ट्रमाता मॉंसाहेब जिजाऊने शिवबाला अमृतमय दुग्ध पाजून शूर वीर तयार केले. माय माऊलींच्या अब्रुचे रक्षण करण्यासाठी अनमोल धडे दिले. जर जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर शिवबा सारखा छावा जन्माला आला नसता. जिजाऊ ने शिवबाला स्वराज्य रक्षणासाठी अनेक सुयोग्य संस्कार केले. शक्ती पेक्षा युक्ती किती महत्त्वाची असते. युद्ध नीतीचे विविध कौशल्य जिजाऊ ने शिवबाला शिकवले. गनिमी काव्याने शत्रूवर कसा विजय मिळवता येतो. मावळे सोबतीला घेऊन शिवबाने किल्ले बांधणे, घोड्यावर बसून तलवार चालवणे, दानपट्टा फिरवणे असे अनेक युद्ध कलेचे प्रशिक्षण घेतले. अस्या महान वंदनिय राजमाता, राष्ट्रमाता मॉंसाहेब जिजाऊस कोटी कोटी वंदन. मॉंसाहेब जिजाऊच्या स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
रत्नाकर बाबुराव पाटील
[सहशिक्षक]
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता.जि. धाराशिव


