श्री क्षेत्र निघोज येथे माता मळगंगेच्या दर्शनासाठी तसेच कुंड पर्यटन क्षेत्र येथे भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे मुलांच्या सुट्टीमुळे तसेच अधिक मासाच्या निमित्ताने भाविक भक्त निघोज येथे मळगंगेच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे अशी माहिती श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अधिकारी श्री महेश जी ढवळे यांनी पत्रकार द्वारे दिली आहे श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज येथील सर्व विश्वस्त सल्लागार निघोज ग्रामस्थ मुंबईकर मंडळ मातेच्या विकासासाठी नेहमीच कार्यरत असून अनेक नवनवीन उपक्रम राबवित आहेत याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे गिनीज बुकात नोंद असलेले कुंड पर्यटन क्षेत्र अतिशय विलोभनीयअसून पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे आपणही या पर्यटन क्षेत्राचा अवश्य लाभ घ्यावा ही श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तर्फे विनंती करण्यात येत आहे ही माहिती श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रसिद्धीप्रमुख ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे

