*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड् यांच्याकडून सविस्तर वृत्त क्षितीज निवड तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील निघोज येथील तनपुरे वस्तीवरील शाळा निघोज जिल्हा परिषद सेमी इंग्लिश व मराठी प्राथमिक शाळेची नुकतीच महाराष्ट्र शासनाकडून आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे या शाळेचा अतिशय नावलौकिक असून मुख्याध्यापक देठे सर ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर ज्येष्ठ शिक्षिका लंके मॅडम व शिक्षिका लाळगे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेऊन या शाळेला उज्वल अशी परंपरा लाभून दिली यासाठी त्यांचे सर्वत्र परिसरात तालुक्यात कौतुक होत असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून तसेच निघोज ग्रामस्थ पारनेर तालुका पत्रकार संघ व अल्पसंख्याक मंडळाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले व पुढील काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत


