*ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासन निवडणुकीमध्ये एडवोकेट माधवीताई बाळ पोद्दार चौथ्या क्रमांकावर निवडून आल्या त्यांचे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवाकडून अभिनंदन करण्यात येत आहे शुभेच्छुक
महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन ची निवडणूक महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यासाठी अतिशय मानाची, महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते. यावेळी २३ सदस्यांसाठी १५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यावेळी २३ पैकी प्रथमच ५ जागा महिला विधी सल्लागारांसाठी आरक्षित होत्या.
या ५ जागांसाठी एकूण ५२ महिला निवडणूक लढवीत होत्या. एकूण १ लाख ९५ हजार मतदारांनी मतदान केले. एवढ्या सगळ्या धामधूमीत आपल्या सोनार समाजभगिनी, पुणे येथे विधी सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या ॲड. माधवीताई बाळ पोतदार यांनी चौथ्या क्रमांका वर निवडून येत महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिएशन मध्ये निवडून येऊन त्यांनी एक नवा इतिहास रचला.
हॆ यश त्यांना सहज मिळाले नाही. त्यासाठी त्यांनी अनेक वकिलांशी संपर्क साधला. सोशल ग्रुपवर सक्रिय राहिल्या. सोनार हितकारिणी सभा, तसेच सकल भारतीय सोनार समाज संघटन चे सोनार विधी सल्ला समुपदेशन केंद्र (कानूनी परामर्श केंद्र) या समूहात समाविष्ट झाल्या. सोनार समाजातील वकिलांशी तसेच समाजसेवकांशी संपर्क साधला.
सोलापूर येथील ज्येष्ठ सोनार समाजसेवक, विधी सल्लागार ॲड. राजन दीक्षित तसेच विविध सोनार समाज संस्थांच्या विद्यमान आणि माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सोनार हितकारिणी सभा या समूहाबरोबरच सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठाच्या महाराष्ट्रातील विविध समूहातून ॲड. माधवीताई बाळ पोतदार यांना समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी आवाहन करण्यात आले. ॲड. माधवी पोतदार यांना निवडून आणण्यासाठी सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी आपल्या संपर्कात असलेल्या सर्व जातीय विधी सल्लागारांना ॲड . माधवीताई यांना प्रथम क्रमांकाचे मत देण्यासाठी आवाहन केले. सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनीही आवाहनास प्रतिसाद देत सकारात्मक प्रतिसाद दिला. धुळे येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष तसेच धुळे येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र (कानूनी परामर्श केंद्र) चे जिल्हा सहसमन्वयक ॲड. अमित मधुकर दुसाने, जिल्हा समन्वयक ॲड.डॉ. राजेंद्र निकुंभ आणि त्यांचे सहकारी, नाशिक येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र जिल्हा समन्वयक ॲड. स्वप्निल सुधाकर विसपुते, ॲड. पराग जाधव, ॲड. डॉ. अचलाताई दहिवाळ, पुणे येथील सोनार, सोनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्रचे जिल्हा समन्वयक ॲड. जगदीश बी. विसपुते आणि त्यांचे सहकारी, वंशावळी डॉट कॉम पुणे चे संस्थापक संचालक श्री. विकास शांताराम विसपुते, ठाणे येथील विधी सल्लागार ॲड. राजेंद्रकुमार गलंगे, वसई येथील ज्येष्ठ विधी सल्लागार ॲड. सतीश रुमाले, सांगली येथील ॲड. संजय धर्माधिकारी, ॲड. सौ. धर्माधिकारी, यवतमाळ येथील ज्येष्ठ विधी सल्लागार ॲड. अरुणराव सागळे, परतवाडा येथील सोनार समाजसेवक तसेच विधी सल्लागार ॲड. जी. बी. मांदळे अशा अनेक सोनार आणि सोनारेतर तसेच ओबीसी प्रवर्गातील विधी सल्लागारांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या ॲड . माधवीताई बाळ पोतदार यांना निवडून आणण्यासाठी प्रचार केला.
निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यापासून ॲड. माधवीताई पोतदार, ॲड. राजन दीक्षित, ॲड. स्वप्निल सुधाकर विसपुते, ॲड. अमित मधुकर दुसाने, ॲड. जगदीश बी. विसपुते, सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक मिलिंदकुमार सोनार हे आपापल्या स्रोतांच्या माध्यमातून अपडेट्स घेत होते. ॲड. माधवीताई पोतदार या पहिल्या पाच मध्ये म्हणजेच पाचच्या क्रमांकावर असल्याची माहिती मिळताच (त्यावेळी बृहन्मुंबई आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील मतमोजणी होणे बाकी होते.) मतमोजणी अंतिम टप्प्यात असताना ॲड. माधवीताई यांच्यासह ॲड. स्वप्निल सुधाकर विसपुते आणि मिलिंदकुमार सोनार यांनी सतर्क होते. अखेर या प्रयत्नांना यश आले. ॲड. माधवीताई बाळ पोतदार या चौथ्या क्रमांकावर विजयी झाल्या.
ॲड. माधवीताई बाळ पोतदार यांचा हा विजय महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिशनच्या अनेक वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घ्यावा, असा आहे.
ॲड. माधवीताई बाळ पोतदार यांचे आम्हां सर्वांतर्फे मनस्वी नि हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की माधवीताई बाळ पोतदार यांनी जिंकलेल्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील सर्व सोनार समाज बांधवाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे
सकल भारतीय सोनार समाज संघटन
सकल ओबीसी सेतुबंधन
युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल
वंशावळी डॉट कॉम, पुणे
ऋग्वेद सुवर्ण वार्ता यूट्यूब प्रसार वाहिनी, नागपूर
अखिल माळवी सोनार महासंघ
अखिल वैश्य सोनार महासंघ
अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार संस्था महाराष्ट्र प्रांतिक मंडळ
दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य, अकोला तसेच दैवज्ञ सोनार महासंघ शी संलग्नित सर्व दैवज्ञ सोनार संस्था
दैवज्ञ सेवाभावी संस्था, नांदेड
एकविचार – एकमंच प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी नगर
अखिल झाडे सोनार महासंघ
विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज महासंघ
अखिल भारतीय अहिर सुवर्णकार मध्यवर्ती मंडळ
श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक)
भारतीय नरहरी सेना, पंढरपूर, जिल्हा सोलापूर
अखिल भारतीय लाड सुवर्णकार समाज सुवर्ण विद्यापीठ
भारतीय सुवर्णकार समाज संस्था (नागपूर), महाराष्ट्र प्रदेश
महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटना
सोनार समाज संस्था, सोलापूर
सोनार एकता फाऊंडेशन, कोल्हापूर
अजमीढ देव जनकल्याण संस्था, मुंबई
मुंबई प्रदेश मैढ क्षत्रिय सोनार समाज
स्वर्णकार सेतु
महाराष्ट्र प्रदेश मैढ क्षत्रिय स्वर्णकार समाज
स्वर्ण कला सोसाइटि उत्तर प्रदेश, प्रयागराज
तसेच सेतुबंधन मधील विविध सोनार संस्था आणि संघटना


