📍पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. काशिनाथ दाते सर यांनी उपस्थित राहून मेजर श्री. रवींद्र रोकडे व श्री. बाणेश्वर शिर्के यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार दाते सर यांनी सहकारी आनंथा शिर्के यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रम प्रसंगीही उपस्थिती दर्शवीली. यावेळी विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला.
आमदार दाते सर म्हणाले की, “देशसेवा, समाजसेवा आणि लोकहिताची जपलेली परंपरा हीच समाजाच्या प्रगतीची खरी ताकद आहे. अशा व्यक्तींच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या सन्मानासाठी एकत्र येणे ही प्रेरणादायी बाब आहे.”
या प्रसंगी मा. सरपंच संजीवनीताई आंधळे, उपसरपंच मिनीनाथ शिर्के, कर्जुले हर्या सैनिकी संघटनेचे अध्यक्ष मेजर उत्तमराव आंधळे, डॉ. विलास जाधव, राजू आंधळे गुरुजी, अनिल कोकाटे, पी. एस. उंडे, शांताराम मुळे गुरुजी, प्रकाश आंधळे गुरुजी, रतन रोकडे, महेंद्र रोकडे, मेजर अशोक कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नेह, आदर आणि शुभेच्छांच्या वातावरणात संपन्न झालेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.


