रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की तथागत गौतम बुद्धांचा जन्म
नेपाळमध्ये लुंबिनी येथे इसवी सन पूर्व ५६३ ला झाला. वडील शुद्धोदन व आई मायादेवी. वडील क्षत्रिय राजा होते. गौतमचा जन्म झाला की सातव्या दिवशी आईचा मृत्यू झाला. मावशी व शुध्दोदनची दुसरी पत्नी राणी महाप्रजापती गौतमीने गौतमचे पालन पोषण केले. गौतम बुद्धांचे नाव सिध्दार्थ होते. बौद्ध साहित्यात त्यांना शाक्यमुनी, गौतम, शाक्य सिंह अशा विविध नावांनी ओळखले जाते. असे सांगितले जाते की,” मायादेवी ही कोलियन वंशाची राजकन्या होती. मायादेवी ही गरोदर अवस्थेत माहेरी जाताना लुंबिनी गावी बुद्धाला जन्म दिला.” सम्राट अशोकांनी या ठिकाणी स्तंभ बांधला. गौतम बुद्धांच्या जन्मानंतर त्यांची जन्म तारीख लिहण्यासाठी दोन विद्वान मान्यवरांना बोलवले. त्यापैकी एकाने भविष्य वाणी केली की,
“हे बालक महान माणूस होईल. संसाराचा त्याग करून संन्यास घेईल.“
भाकित ऐकुन राजा शुध्दोदन चिंतीत झाले. यशोधरा सोबत वयाच्या सोळाव्या वर्षी गौतमचे लग्न झाले. सुखाचा संसार सुरू झाला. यशोधरा व सिद्धार्थ यांना मुलगा झाला. त्याचे नाव राहूल ठेवण्यात आले. सिध्दार्थने गुरू विश्वामित्र यांच्या कडे वेद,उपनिषदाचा अभ्यास केला. राजेशाही, युद्ध शास्त्राचे शिक्षण, कुस्ती, घोडदौड, बाण व रथ हे सर्व शिक्षण घेतले. गौतम बुद्ध मुलाच्या जन्मानंतर दु:खाने सांगतात, ” आज माझ्या बंधनाच्या साखळीतील आणखी एक कडी वाढली आहे.”गौतम बुद्ध आपल्या सारथी मित्रासोबत फिरायला जायचे. त्यांनी जगातील अनेक दु:ख पाहिले. ते विरक्त झाले. संसारात त्यांचे मन रमेना. मनात अलिप्ततेची भावना प्रबळ झाली. अचानक एका रात्री आई वडील पत्नी,मुलगा,राजसत्ता सोडून जंगलात निघून गेले.वयाच्या २९व्या वर्षी घर सोडून गेले.आपले मौल्यवान कपडे,दागिने काढली व केस कापली व भगव्या रंगाची कपडे परिधान करून संन्यासी झाले.सत्य व ज्ञानाच्या प्राप्ती साठी कठोर तपश्चर्या केली.सारनाथ येथील बौद्ध गया नावाच्या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञान संपादनाचा विचार करू लागले. सलग सात दिवस चिंतन,मनन केले वैशाख महिन्यात पौर्णिमेच्या आठव्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले .
माणसाची वासना दुख:चे मूळ आहे.
इच्छा व वासना दमन करून मन शांती मिळते. वयाच्या ३५ व्या वर्षी ज्ञान प्राप्त झाले आणि सिध्दार्थ बुद्ध झाला. बोधगया येथे ज्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले तो बुद्ध वृक्ष म्हणून ओळखला जातो.
बौद्ध धर्माची आधारशिला म्हणजे चार उदात्त सत्ये.
महात्मा बुध्दाच्या मते जग हे दु:खाचे घर आहे.
भगवान गौतम बुद्ध ज्यांनी आपल्या महान विचारांनी,शिकवणीने जगाला एक नवीन मार्ग दाखवला.समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात लाग मोलाचे योगदान आहे.गौतम बुद्धांच्या विचारांचे पालन करून अनेक लोक जीवनात यशस्वी झाले.गौतम बुद्ध एक महान भारतीय तत्वज्ञ,वैज्ञानिक,धार्मिक नेते,थोर समाजसुधारक,बौद्ध धर्माचे संस्थापक होते.जगातील सर्वात महान
व्यक्तीमत्व,प्रभावशाली व्यक्ती,,जगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी आहेत.बुद्ध ही नाव नसून ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध शब्दाचा अर्थ
अकाशा एवढा प्रचंड ज्ञानी.
जगाच्या इतिहासात महामानवात तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धाच्या धम्माला, संघाला शरण जा.
“बुद्धम् शरणम् गच्छामी
धम्मम् शरणम् गच्छामी
संघम् शरणम् गच्छामी”
रत्नाकर बाबुराव पाटील * [सहशिक्षक ]
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,
शिंगोली ता. जि. धाराशिव


