📍 देवीभोयरे ग्रामपंचायतीचे मा. कार्यक्षम सरपंच श्री. अशोकरावजी मुळे यांचा विशेष सत्कारपारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरोडे यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
*लोकमत वृत्तसमूह व एम. पी. बिर्ला उद्योग समूह यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेला *”आदर्श सरपंच पुरस्कार २०२६” झाल्याबद्दल मा. कार्यक्षम सरपंच श्री. अशोकरावजी मुळे यांचा खासदार, लोकनेते मा. निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला.* यावेळी वाळवणेचे सरपंच सचिन आप्पा पठारे मा. सरपंच जयवंतराव मुळे, मा. सरपंच विठ्ठलराव सरडे, मा. उपसरपंच तथा अंबिका माता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संपतराव वाळुंज, राष्ट्रवादी प्रदेश युवा नेते जितेश सरडे, युवा नेते गणेश बेलोटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही योग्य पावती असून, मा. अशोकरावजी मुळे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
“कर्तृत्वाचा सन्मान, विकासाच्या वाटचालीला नवी उभारी!” 🚩


