{रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी}
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक, स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राण पणाला लावले.देशाला स्वातंत्र्य मिळाले पण देशात जातीव्यवस्थेचे प्रस्त अस्तित्वात आले. जातीभेदांने बुरसटलेल्या मनावर प्रहार करण्याचे कार्य शाहू, फुले, आंबेडकरांनी केले. समाजातील जातिभेद नष्ट करून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आण्णाभाऊ सतत धडपडत राहिले.महाराष्ट्राचे वैचारिक अधिष्ठान म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर होय. आण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्सचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव पडला.
आण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ आगस्ट १९२० ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या छोट्याशा खेड्यात झाला. वडील भाऊराव साठे, आई वालाबाई साठे. आण्णांचे नाव तुकाराम होते. मातंग दलित कुटुंबात आण्णांचा जन्म झाल्यामूळे जातिभेद, उंच- निच या गोष्टी जवळून आनूभवल्या. घरची अत्यंत गरीबी परिस्थिती होती. घरात सतत अष्ट दारिद्र्य नांदत होते. आण्णांचे बालपण खेड्यात गेले. शाळेत फक्त दिड दिवस गेले. त्यावेळी दलितांना अमानुष वागणूक दिली जात होती. जातिभेदाच्या विळख्यात देश होता. आण्णांला शिक्षण सोडून अशिक्षित रहावे लागले. निरक्षर नावाचा शाप आण्णांला मिळाला. आण्णांचे लग्न कोंडाबाई नावाच्या मुली बरोबर झाले. परत आण्णांनी दुसरा विवाह केला तो जयवंता नावाच्या मुलीसोबत. आण्णांला दोन पत्नी होत्या. सुखी संसाराच्या वेलीवर तिन फुले जन्मली. मधुकर, शांता व शकुंतला अशी अपत्य झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव व कार्ल मार्क्सच्या च्या विचारांनी आण्णां प्रभावीत झाले होते.आण्णांनी दीन- दलितांचे होणारे शोषण अनुभवले. शाहिरी, कथा- कादंबरी, लोकनाट्य, पोवाडे, लावणी, पथनाट्ये या लोककलेच्या माध्यमातून दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र धडपड केली. आण्णा हे मांग ( मातंग) समाजातील असल्यामूळे ते दीन- दलितांचे कैवारी होते. आण्णांची फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र सरकारने साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लावणीची पारंपरिक पद्धती बंध करून लावणीला समाजमान्य दर्जा मिळवून देण्याचे अनमोल कार्य आण्णाभाऊने केले. लावणी ही फक्त पुरुषांनी पहाण्याची मक्तेदारीला छेद दिला.लावणी ही स्त्रीयांना पाहण्यासाठी शृंगारिकता वाढवली. फडावरची लावणी व बैठकीची ठसकेबाज लावणी असे प्रकार केले.आपल्या भारत देशातील माता भगिनी लावणी रसीक म्हणून पहाण्यासाठी यायला लागल्या.लावणी ही जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून दर्जा मिळवून दिला.ज्ञान,मनोरंजन, लोकरंजनातून समाज प्रबोधन करण्याचे अनमोल कार्य आण्णांनी केले.
पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर वसली नसून ती गरीब कष्टकरी मजूरांच्या तळहातावर वसली आहे.
आण्णांला गरीब, दलितांचे दु :ख पाहवत नसे. ते आपल्या परखड साहित्याच्या माध्यमातून समता, बंधूंभाव व स्वातंत्र्याबद्दल बोलत असे.
श्रीमंत लोकांच्या मोटारी ह्या पेट्रोलवर चालत नसून गरीबांच्या रक्तावर चालतात*.
वडील मुंबईच्या झोपडपट्टीत रहात असल्याने लोकांच्या व्यथा जवळून पाहता आल्या होत्या.
*गिरणी कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून यावी यासाठी आण्णांनी चळवळ सुरू केली*
. आण्णांचे कार्य हे दलितांचे जीवनमान सुधारण्यासाठी अर्पण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वसा आण्णांनी पुढे चालवला. दलितांचे आश्रू पुसण्यासाठी त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, शोषण थांबावे म्हणून तमाशा, लावणी, कथा, कादंबरी, शाहिरी, पोवाडे या साहित्यांच्या माध्यमातून निर्भीड कार्य केले.
माझी मैना गावाकडे राहिली,
माझ्या जीवाची होतिया काहिली.
अशी ठसकेबाज लावणीतून समाज प्रबोधन केले. दलित साहित्यांच्या चळवळीत एक मानाचा तुरा गोवण्याचे महत्त्वाचे योगदान दिले. शाहिरी डफ, तूनतूने वाजवून लोकरंजन केले. पोवाडे, कथा कादंबरी, लावणी, तमाशा या विविध साहित्य माध्यमातून जातिव्यवस्था नष्ट करून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आण्णांनी मिळवून दिला. दलित साहित्याचे आण्णाभाऊ साठे एक महामेरू होते. आण्णाभाऊचे साहित्य माकडीचे माळ, डोंगरची मैना, फकिरा, टिळा लावते मी रक्ताचा, चिखलातील कमळ,अलगूज,वारणेचा वाघ असे अनेक साहित्यिक पुस्तके लेखन केली आहेत. आण्णाभाऊच्या साहित्यावर अनेक चित्रपट तयार झाले आहेत. वैजयंता,डोंगरची मैना,टिळा लावते रक्ताचा, फकिरा लोकप्रिय चित्रपट आहेत.अशा महान कलाकारास लोकशाहिरास “साहित्यरत्न” या उपाधीने सन्मानित करण्यात आले. दीन- दलितांचे कैवारी आण्णाभाऊ साठे यांना कोटी – कोटी वंदन व मानाचा मुजरा.
रत्नाकर बाबुराव पाटील
{पर्यवेक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता. जि.धाराशिव



