कांद्याच्या भावामध्ये तेजीचे संकेत; शेतकऱ्यांनी घाईघाईने विक्री न करता टप्प्याटप्प्याने कांदा विकावा,(शेतकरी नेते आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रुपेश दादा ढवण). ज्येष्ठ पत्रकार डॉ श्री मुकुंद निघोजकर यांच्याकडून येत्या काळात कांद्याच्या बाजारभाव तेजी येण्याची संकेत दिसत आहे कांदा मार्केट मध्ये दररोज हळूहळू वाढ होत असल्याने चित्र आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्ण कांदा एकाच वेळी विक्री न करता टप्प्याटप्पे कांदा विक्री करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कधी कधी दोन चार दिवस कांद्याच्या दरात दोन ते चार रुपयांनी मंदी आली तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही सध्या उपलब्ध परिस्थितीचा विचार करता कांदा थोडा थोडा करून विक्री करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते कांदा पिकासाठी साधारण चार महिने लागवडीनंतर उत्पादन मिळते आणि त्यानंतर चार ते सहा महिने साठवणूक करून योग्य बाजार भाव मिळाल्यास विक्री करण्यासाठी संधी असते. राज्यातील काही भागांत कांद्याचे क्षेत्र कमी झाले असून यंदा पावसाला झालेला उशीर लक्षात घेता लाल कांद्याची लागवड ही उशिराने होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी कांद्याला चांगली तेजी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करण्यापूर्वी जवळच्या दोन-तीन बाजारपेठे मधील दरांची माहिती घ्यावी तसेच यंदा उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने साठवणूक केलेल्या कांद्याकडेही वेळोवेळी लक्ष देणे आवश्यक आहे साठवलेल्या कांद्यांची गुणवत्ता खराब होत असल्याने दिसून आल्यास योग्य वेळी विक्री करून नुकसान टाळावे आपल्या कांद्याला ज्या बाजारपेठेत चांगला भाव मिळेल तेथे विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मित्रांनो पिकवायला शिकलात आता योग्य वेळी विकायला शिका …. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कांद्यला कवडीमोल भाव मिळाला होता गेले दोन-तीन वर्षात शेतकऱ्यांचं कमी बाजारभावामुळे खूप आर्थिक नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरे जायला लागलं आहे आणि ह्या वेळेस आलेले संधी शेतकऱ्यांनी त्या संधीचं फायदा घ्यावा संधीचं सोनं कराव योग्य वेळी आपला कांदा द्यावा टप्प्याटप्प्यानं विकावा हेच आव्हान करतो…आपली माती आपली माणसं 🙏🤝



