पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की गेल्या शंभर वर्षाची परंपरा असलेली नागपंचमी निमित्ताने कलगीतुरा कार्यक्रम मोठ्या उत्सवात होत असतो यासाठी इतर जिल्ह्यातून तालुक्यातून लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी येत असतात या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री मळगंगा देवी यात्रा कमिटी समस्तग्रामस्थ तसेच श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज व विविध संघटनांच्या माध्यमातून हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात माता मळगंगेच्या गाण्याने झाली हा कार्यक्रम साधारणतः सायंकाळी सहा वाजेपर्यंत होत असतो या वर्षी नेहमीप्रमाणे श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्यामार्फत सर्व भाविक भक्तांना खिचडीचा प्रसाद दिला गेला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सालाबाद प्रमाणे शाहीर श्री मुरलीधर सुपेकर यांनी केले अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी कलगीतुरा शाहीर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी अतिशय मनमोहक अशी गीते सादर केली

