कै. जिजाबा विष्णू लंके यांच्या पावन स्मरणार्थ महाप्रसाद वाटप
मुकुंद निघोजकर जेष्ठ पत्रकार निघोज याचकडून
महाप्रसाद सेवेचे पुण्यकार्य
अतिशय श्रद्धा, सेवाभाव व सामाजिक जाणीवेतून स्वीकारणारे श्री.विठ्ठलशेठ जिजाबा लंके,मा.श्री.मच्छिंद्र जिजाबा लंके व मा. श्री. बंडू जिजाबा लंके यांचा देवस्थानच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
काल ऐनवेळी निर्माण झालेल्या वीज समस्येमुळे भाविकांची गैरसोय होत असल्याची माहिती मिळताच,
मुंबई येथून व्हिडिओ कॉलद्वारे आदरणीय विठ्ठलशेठ लंके यांनी तात्काळ परिस्थितीची चौकशी केली
आणि क्षणाचाही विलंब न करता जनरेटर उपलब्ध करून देण्याची कबुली दिली.
सेवेच्या या तत्परतेतून त्यांचा विशाल मनोभाव, दातृत्व आणि भाविकांप्रती असलेली आपुलकी स्पष्टपणे दिसून आली.अशा संवेदनशील, सेवाभावी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वामुळेच देवकार्य अखंडपणे सुरू राहते.
या अमूल्य सहकार्याबद्दल देवस्थानच्या वतीने त्यांचे
कोटी कोटी आभार,
स्वामी समर्थांची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. 🙏
