परम पूज्य महाराजांचा 69 वा पुण्यतिथी कार्यक्रम
सर्व भाविक भक्त गण आणि समस्त शिष्य वर्ग यांना कळविण्यात येते की, सालाबाद प्रमाणे या हि वर्षी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी टेंबे महाराज मंदिर गायमुख अवसरी खुर्द या ठिकाणी माघ कृष्ण प्रतिपदा, दि. 02/02/26 , सोमवार रोजी परम पूज्य महाराजांची 69 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. त्यानिमित्त पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे
श्रीगुरुचरित्र परायण — पारायणाची सुरुवात दि.27/01/26 , मंगळवार रोजी होईल व सांगता 02/02/26 रोजी होईल. त्यासाठी इच्छुक भक्त गणांनी मंदिरात नवे कळवावीत, जेणेकरून नियोजन करता येईल.
पौर्णिमा कार्यक्रम — दि.01/02/26, रविवार रोजी सकाळी 9.00 वाजता श्रीसूक्त हवन होईल.
संध्या. 4.30 ते 6.00 पर्यंत भजन व सत्संग .
सायंकाळी 6.00 वाजता पालखी व आरती होईल.
त्यानंतर प्रसाद.
गुलाल — दि. 2/02/26 रोजी रात्री 8.00 ते 9.00 पर्यंत जेवण ( प्रसाद) नंतर 9.00 ते 10.40 पर्यंत भजन व सत्संग. रात्री 10.45 वाजता महाराजांच्या जय घोषात महाराजांना गुलाल अर्पण केलाजाईल.नंतर आरती होईल.
महाप्रसाद —– दि. 3/02/26 मंगळवार रोजी दुपारी 12.00 वाजता आरती व त्यानंतर महाप्रसाद होईल.
तरी सर्व भाविकांना मंदिर ट्रस्ट तर्फे नम्रविनंती की त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाला शोभा आणावी.
