देहू येथील श्री संत नरहरी महाराज संस्था यांनी रविवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी देहू येथे श्री संत नरहरी महाराज सायोज्यसमाधी 740 उत्सव सोहळा मोठ्या दिमाकात पार पाडला यामध्ये पुणे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व सुवर्णकार समाजातील माता भगिनी यांनी हजेरी लावली यावेळेस संस्थेचे अध्यक्ष श्री भूषण शेठ भरत काका बेलेकर तसेच सर्व विश्वस्त पदाधिकारी सल्लागार यांनी दिपप्रज्वलन मान्यवरांचा सत्कार प्रवचन तसेच महिलांसाठी खास पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त मानसी खोल्लम तसेच कोषाध्यक्ष श्री विनायक निघोज कर सर यांनी खूप असे सहकार्य देऊन कार्यक्रमाला रंगत आणली अभूतपूर्वअसा कार्यक्रम झाला असून या कार्यक्रमाची सर्वत्र प्रशंसाकेली जात आहे यावेळी आळंदी येथील माजी विश्वस्त श्री शांताराम जी खोल्लमसाहेब यांनी गौरवोद्गार काढले लवकरच श्री संत नरहरी महाराज यांची भव्य अशी वास्तू समाजाने घेतलेल्या वास्तूमध्ये उभारली जाईल असा मानस संस्थेचे मार्गदर्शक श्री भरत शेठ बेलेकर यांनी पत्रकार द्वारे केले आहे अशी माहिती समाजातील जेष्ठ पत्रकार व प्रसिद्धी प्रमुख मुकुंद निघोज कर यांनी दिली
खरेच सर्वच कार्यक्रम एकदम सुंदर झाले, जेवण सुद्धा एकदम स्वादिष्ट होतं👌🏻👌🏻👌🏻संस्थेचे सर्व विश्वस्त, कार्यकारिणी मंडळ, कार्यकर्ते, अन्नदाते, आयोजक, सर्व महिला कार्यकर्त्या आणि इतर सर्वच समाज बंधुभागिनी ह्यांची सर्वांची खुप खुप कृतज्ञता, अभिनंदन आणि मंदीराच्या उभारणीच्या कामास लवकरच विकासाचे पंख मिळून ह्या भव्य दिव्य वास्तूचा कळस लवकरच समाजहिताच्या कार्यातून प्रगतीच्या, यशाच्या उंच गगनाला भिडण्यासाठी आमच्याकडून अंतर्मनपूर्वक शुभेच्छा आणि संत नरहरी महाराजांच्या चरणीं नतमस्तक होऊन हीच प्रार्थना!🌹🙏🏻….पैठणीच्या खेळात सहभागी झालेल्या सर्व मैत्रिणी तसेच सव समाज बंधूंचे विशेष कौतुक🤗💐💐🍨🍫🍫…..पैठणी विजेत्या ठरलेल्या आमच्या सुनबाई अनुजा खोल्लम व इतर सर्व मैत्रिणींचे खुप खुप अभिनंदन(त्यांचीही नावे पाठवावीत प्लिज)😇😇💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🥳🥳🥳🥳🥳

