पत्रकार नाना ढवळे यांच्याकडून
छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातींच्या रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वधर्मसमन्वयाचे धोरण राबविले. शेतकरी रयत आणि महिलांचा सन्मान ठेवला. असे प्रतिपादन पारनेर तालुका शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष डॉ श्रीकांत पठारे यांनी केले. ते देवीभोयरे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील शिवसन्मान प्रतिष्ठानतर्फे हिंदू तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूकही काढण्यात आली होती. या मिरवणुकीनंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सोहळ्याचा एक भाग म्हणून गावातील मान्यवरांचा आणि गुणवंत शाळकरी मुलांचाही सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे महिलांसाठी खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.
या वेळेस व्यासपीठावर विकासशेठ सावंत, माजी उपसरपंच, देवीभोयरे, विश्वनाथ गाजरे गुरुजी, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार नाना ढवळे, बाबुराव मुळे, बबन मुळे, अक्षयशेठ बेलोटे, ताराचंद गाजरे , शरद बोरुडे, कमलाकर बेलोटे, बाबुराव बेलोटे, भाऊसाहेब बेलोटे, रामदास बेलोटे, नरेंद्र बेलोटे, जगन बेलोटे, विक्रम बेलोटे, विश्वनाथ बेलोटे, हर्षद झावरे, संदीप बेलोटे, संतोष केदारी, बाळासाहेब बेलोटे, रावसाहेब वाळुंज सर, दादाभाऊ बेलोटे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गजरे यांनी केले.
जय जिजाऊ, जय शिवराय अशा खेळीमेळीच्या वातावरणात शिवजयंतीचा सोहळा पार पडला.
