सराफ संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख श्री मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून
आज दिनांक २९ एप्रिल २०२६, बुधवार रोजी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन व उपोषणाची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे आंदोलन पूर्णपणे संविधानिक मार्गाने, न्याय व कायद्याच्या चौकटीत राहून सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. काकासाहेब बुऱ्हाडे व प्रदेशाध्यक्ष मा. श्री. उमेश शेठ बुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली सराफ सुवर्णकार व संलग्न व्यावसायिक बांधव आपल्या हक्कांसाठी एकत्र आलेले आहेत.
आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
1) संबंधित प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी.
2) प्रकरणासंदर्भात त्वरित एफ.आय.आर. दाखल करण्यात यावी.
जर या न्याय्य व कायदेशीर मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर उद्यापासून अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे.
हे आंदोलन कोणत्याही जाती, धर्म किंवा राजकीय हेतूंशी संबंधित नसून, केवळ सराफ सुवर्णकार व संलग्न व्यवसायाच्या संरक्षणासाठी आणि न्यायासाठी उभे केलेले आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांच्या आधारे आम्ही शांततामय व लोकशाही पद्धतीने आपला आवाज उठवत आहोत.