शिक्षणामुळे आयुष्य उज्वल –
प्रा नारायण म्हस्के
नेवासा तालुका प्रतिनिधी
बाळासाहेब बोधक
शिक्षण व आरोग्य काळाची गरज होय. विद्यार्थांनी शिस्तप्रिय रहात आपले भावी आयुष्य उज्वल करावे असे विचार शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा डॉ नारायण म्हस्के यांनी व्यक्त केले .जिजामाता उच्च माध्यमिक विभागात इ ११ वी च्या विद्यार्थाचा स्वागत समारंभ दि.२२ रोजी आयोजित करण्यात आला होता .प्रसंगी अध्यक्षस्थानी विश्वस्त प्रा डॉ नारायण म्हस्के होते .
प्रसंगी संस्थेचे सचिव अनिल शेवाळे, विश्वस्त डॉ नारायण म्हस्के ,विश्वस्त अशोकराव मिसाळ ,माजी जि प सदस्य दत्तात्रय काळे ,नामदेवराव निकम ,पत्रकार सुखदेव फुलारी ,विस्तार अधिकारी भागीनाथ बडे , केंद्रप्रमुख भास्कर तांबे , प्रा शशिकांत देशमुख ,प्राचार्य शिवाजी मुंगसे ,माजी प्राचार्य बाळासाहेब पंडीत ,प्रा गोरक्षनाथ पाठक, प्रा सुधाकर नवथर ,प्रा संतोष सोनवणे ,प्रा गणपत घनवट ,प्रा अविनाश टाक आदी व्यासपिठावर उपस्थित होते .
प्रसंगी सचिव अनिल शेवाळे ,जलमित्र सुखदेव फुलारी, विस्तार अधिकारी बडे, श्रद्धा विधाटे ,प्रा नारायण म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले . प्रसंगी उच्च माध्यमिक विभागात इ १२वी मध्ये कला,शास्त्र ,वाणिज्य विभागात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच सीईटी परीक्षेत उज्वल यश संपादक करणाऱ्या विद्यार्थांचा सन्मान यावेळी करण्यात आला .
प्रास्ताविक प्रा भारत वाबळे यांनी व्यक्त केले .सूत्रसंचालन प्रा नानासाहेब खराडे व प्रा सविता नवले यांनी केले .आभार प्रा नंदकिशोर मते यांनी मानले .
चौकट –
आवडीच्या क्षेत्रात करिअर करा
विदयार्थी जीवनात अकरावी – बारावीचे दोन वर्ष आयुष्याला दिशा देणारे आहे . विद्यार्थांना सातत्यपूर्ण अभ्यास करत ध्येय निश्चित करत आवडीच्या क्षेत्राची निवड करून यथ संपादन करत आई – वडीलांचे स्वप्न साकार करत यशस्वी वाटचाल करावी .
अनिल शेवाळे
( कार्यकारी संचालक तथा सचिव श्री घुले पाटील शिक्षण संस्था )


