*श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज प्रसिद्धीप्रमुख ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोज परिसरातील एक दांडगे दानशूर समजले जाणारे व्यक्तिमत्व माननीय अमृत शेट रसाळ साहेब उपाध्यक्ष श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तसेच अध्यक्ष मळगंगा कन्स्ट्रक्शन यांनी देवीच्या जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरासाठी 37500 तसेच निघोज येथील देवीच्या नावाने चालवीत असलेल्या श्री मळगंगा प्रसादालयास पाच हजार रुपये देणगी अशी एकूण 42 हजार 500 रुपयांचे देणगी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे यापूर्वी त्यांनी देवीच्या कार्यासाठी वेळोवेळी खूप मोठी मदत केली आहे त्यांच्या या दानशूरपणाबद्दल परिसरात कौतुक केले जात आहे स्वतःपासून सुरुवात करा असा एक संदेशच त्यांनी विश्वस्त मंडळाला दिला आहे व नवीन विश्वस्त मंडळ माननीय कार्याध्यक्ष व स्वर्गीय बाबासाहेब कवाद यांचे चिरंजीव वसंतराव कवा द सर तसेच त्यांचे संपूर्ण विश्वस्त मंडळ सल्लागार सातत्याने देवीच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात देवीच्या विकास कामाकडे लक्ष दिलेले असल्यामुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे ही माहिती श्री मळगंगा ग्रामीण विकासाचे सचिव माननीय शांताराम कळस्कर साहेब यांनी दिली आहे



